bus blocking threat Kelshi Sarpanch Dainik Gomantak
गोवा

Quelossim Bus Issue: ..अन्यथा बस अडवू! केळशी सरपंचाचा इशारा; मोबोर मार्गावर प्रवाशांना अपमानास्पद वागणूक दिल्यावरून संताप व्यक्त

Quelossim Mobor route controversy: केळशी मोबोर मार्गावर प्रवाशांसाठी वाहतूक करणारे काही खासगी बसचालक मनमानी करत असून प्रवाशांना वेठीस धरण्याचे प्रकार वाढले आहेत.

Sameer Panditrao

मडगाव: केळशी मोबोर मार्गावर प्रवाशांसाठी वाहतूक करणारे काही खासगी बसचालक मनमानी करत असून प्रवाशांना वेठीस धरण्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी कोलवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सोमवारी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवताना सरपंच वाझ यांनी स्पष्टपणे सांगितले की, अशा गैरप्रकारांना गावकरी आणि स्थानिक प्रशासन मुळीच सहन करणार नाही. पोलिसांनी त्वरित योग्य ती कारवाई करावी, अन्यथा गावकरी व स्थानिक लोक बस अडवून आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला.

केळशी मोबोर मार्गावर सध्या कदंब बससेवा कार्यरत आहे. मात्र कदंब बसच्या वेळेच्या आधीच काही खासगी बसवाल्यांकडून आपापल्या बसेस रस्त्यावर उतरवून प्रवाशांना अडवले जाते. या गोंधळात प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.

हल्लीच घडलेल्या एका घटनेत, एका महिलेसह दोन मतिमंद मुलांवर खासगी बसचालकांनी अपमानास्पद वागणूक दिली. या प्रकारामुळे स्थानिकांत संतापाचे वातावरण आहे. सरपंच वाझ यांच्या या तक्रारीमुळे पोलिसांनी तपास सुरू केला असून, लवकरच संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे सूत्रांकडून समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cigarette Price Hike: सिगारेट ओढणाऱ्यांसाठी चटका देणारी बातमी! 4 पटीने वाढणार किंमत; धूम्रपान करणाऱ्यांना सरकारचा मोठा धक्का

Rohit Sharma Viral Photo: 'मी रोहित शर्मासारखा दिसतोय हे ऐकून.. ', हिटमॅनसारख्या दिसणाऱ्या खेळाडूने जिंकले फॅन्सचे हृदय; पहा Video

Goa Dhirio: कोलवामध्ये पुन्हा 'धिरिओ'चा थरार; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, प्राणीमित्रांकडून कारवाईची मागणी

पर्यावरण मूल्यांपासून आपण दूर जातोय का? गोव्यातील निसर्गस्नेही जत्रांचे बदलणारे स्वरुप आणि सावधगिरी

Viral Post: "चार्म गेला, सर्वात वाईट परिस्थिती"! गोवा पर्यटनाबद्दल रंगली चर्चा; सोशल मीडियावर दिली कारणांची लिस्ट

SCROLL FOR NEXT