Sameer Panditrao
धावे, सत्तरी येथील नागरिकांनी कदंब गाडीच्या पूजेची परंपरा गेली ४४ वर्षे जपली आहे.
१९८० साली कदंब महामंडळाची धावे पणजी पहिली बस धावे येथून सुरू झाली होती.
त्यामुळे दरवर्षी दसऱ्याला धावेवासीय विशेष पाठविलेली कदंब गाडीची मोठ्या भक्ती भावाने पूजा करतात.
कदंब महामंडळाने विद्यूत रोषणाईने सजवून रात्रीची विशेष खास कदंब गाडी धावे गावात पाठवली होती
१९८० साली राज्यात कदंब महामंडळ सुरू झाले व खऱ्या अर्थाने दळण वळणाची सेवा सुरू झाली. धावे ते पणजी अशी नंबर १ कदंब गाडी सुरू झाली.
एक नंबरच्या गाडीचा मान धावे गावाला मिळाला. त्यावेळेपासून गेली ४४ वर्षे धावे गावात कदंब सेवा सुरू आहे.
धावे बरोबरच आंबेडे, नगरगाव, उस्ते, वाळपई या ठिकाणीही या रात्रीच्या विशेष गाडीची पूजा करण्यात आली.