PWD Goa News : सार्वजनिक बांधकाम खात्याने पाणी बिलाची रक्कम वन टाईम सेटलमेंट योजनेची वाढविलेली एक महिन्याची मुदत 28 फेब्रुवारीला संपत आहे. त्यात काही दिवसांपासून अनेकांकडून बिल भरले जात असल्याने त्याचा परिणाम सर्व्हरवर होत असल्याचे सांगितले जाते.
सर्व्हरमध्ये बिघाड आल्याने बिल भरणाऱ्यांनाही नक्की काय होतेय, याची कल्पना येत नाही. योजना एक महिना वाढविली असली तरी अद्यापही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात बिल भरण्यात अडचणी येत असल्याने त्या सोडविण्याकरिता येणाऱ्यांची संख्या काही कमी नाही.
लोकांच्या अडचणी वाढत असल्याने त्या सोडविण्यासाठी ‘सांबाखा’ने अधिक कर्मचारी त्यासाठी जुंपल्याची माहिती कार्यकारी अभियंता उत्तम पार्सेकर यांनी दिली.
अनेकांकडे बिलाच्या प्रतीच नाहीत !
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ऑनलाईन बिले भरावयाची असली तरी बँक खाते ऑनलाईन सेवेशी जोडलेले असणे आवश्यक आहे. या बाबी अनेकांच्या लक्षात येत नाहीत, ज्यांना ही बाब लक्षात येत नाही, ते सरळ साबांखा कार्यालय गाठत आहेत.
अद्याप अनेकांना पाणी बिलाच्या प्रतिच मिळाल्या नसल्याच्याही तक्रारी येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जानेवारीत ही योजना सुरू झाली होती, त्यानंतर फेब्रुवारीपर्यंत या योजनेची मुदत वाढविली. 28 फेब्रुवारी हा योजनेचा शेवटचा दिवस आहे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.