Goa Youth Congress Protest Dainik Gomantak
गोवा

Goa Youth Congress Protest: गळ्यात बटाटे, टोमॅटोच्‍या माळा घालून निषेध; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मोर्चा

महागाई, बेरोजगारी विरोधात युवक काँग्रेस आक्रमक

दैनिक गोमन्तक

Goa Youth Congress Protest: राहुल गांधी यांच्याविरोधात झालेली अन्यायकारक कारवाई, वाढलेली महागाई आणि बेरोजगारी या विरोधात युवक काँग्रेसने देशभर आंदोलन छेडले आहे. गोव्यातही त्याला प्रारंभ झाला असून, मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या पणजी-आल्‍तिनो येथील निवासस्थानी युवक काँग्रेसने काढलेला मोर्चा रोखण्यात आला.

गळ्यात बटाटे, टोमॅटोच्‍या माळा, हातात सिलिंडर घेऊन मोर्चात अनेक कार्यकर्ते दाखल झाले होते. पैकी काही जणांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.

युवक काँग्रेसच्यावतीने दुपारी आझाद मैदानावर निदर्शने करण्‍यात आली. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टोमॅटो, कांदा, मिरची यांचे हार गळ्यात घातले होते, काहींनी ते हार डोक्याला बांधले होते.

भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव रिची भार्गव, विजय भिके, एहराज मुल्ला, ‘एनएसयूआय’चे नौशाद चौधरी यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा त्यात सहभाग होता.

आझाद मैदानावरून घोषणाबाजी सुरू करून मोर्चा आल्तिनोवरील मुख्यमंत्री निवासस्थानाकडे पोहोचला. महालक्ष्‍मी बंगल्‍यानजीक शंभर मीटर अंतरावर मोर्चा अडविण्‍यात आला. त्याठिकाणी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चूल पेटवून पदार्थ तयार केले.

ते पदार्थ महागाई व बेरोजगारीच्या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी कार्यकर्ते पुढे सरसावले. पण पोलिसांनी त्‍यांना रोखले.

अच्छे दिन हेच काय?

भाजप सरकार युवकांना नोकऱ्यांचे आमिष दाखविते, बेरोजगारी वाढली आहे, त्यामुळे युवकांमध्ये संताप आहे. त्याशिवाय गोवा राज्य सरकारने तीन सिलिंडर मोफत देणार म्हणून सांगून जनतेची फसवणूक केली.

महागाई वाढत आहे, टोमॅटो 120 रुपये किलोवर पोहोचला आहे. त्यामुळे भाजप सरकारचे अच्छे दिन हेच काय? असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT