मनपा निवडणुकीचे चित्र आज होणार स्पष्ट, 30 पैकी 17 प्रभागांत थेट लढत; छाननीअंती 77 उमेदवार रिंगणात

Panaji Municipal Election: पणजी महापालिका सर्वसाधारण निवडणुकीतील चित्र गुरुवार, (ता.२६) स्पष्ट होणार आहे. ३० पैकी १७ प्रभागांत दोन उमेदवारांत सरळ लढत होईल, असे आज छाननीनंतर स्पष्ट झाले आहे.
Panaji Municipal Election
Panaji Municipal ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पणजी महापालिका सर्वसाधारण निवडणुकीतील चित्र गुरुवार, (ता.२६) स्पष्ट होणार आहे. ३० पैकी १७ प्रभागांत दोन उमेदवारांत सरळ लढत होईल, असे आज छाननीनंतर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अन्य प्रभागांतही असेच होईल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

निवडणुकीसाठी अर्ज छाननीनंतर एकूण ७७ उमेदवार रिंगणात उरले आहेत. ही निवडणूक ३० प्रभागांमध्ये होणार आहे. प्रभाग क्रमांक ११ मधील उमेदवार राकेश भिकोेजी यांचा उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान फेटाळण्यात आला आहे.

छाननी आणि माघारीनंतर जाहीर झालेल्या अंतिम यादीप्रमाणे, १७ प्रभागांमध्ये थेट दोन उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार असून निम्म्याहून अधिक प्रभागांत अटीतटीची लढत रंगणार आहे.

प्रभाग क्रमांक २६ हा सर्वाधिक गर्दीचा प्रभाग ठरला असून येथे पाच उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत ही सर्व प्रभागांपैकी सर्वाधिक संख्या आहे. काही प्रभागांमध्ये तीन किंवा चार उमेदवार रिंगणात असल्याने तिथे बहुकोनी लढती होणार आहेत. मतदान ११ मार्चला व मतमोजणी १३ मार्च रोजी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com