

पणजी: राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (आयपीबी) बुधवारी ४४५.२४ कोटींच्या दहा प्रकल्पांना मंजुरी दिली असून, त्यातून राज्यभरातील औद्योगिक वसाहतींमध्ये ८०१ नोकऱ्या तयार होतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
मंडळाने बुधवारी ज्या प्रकल्पांना मान्यता दिली, त्यात डीजेईएफ लेझर अँड हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या धारबांदोडा येथील, सिंजेंटा बायोसायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या खोर्लीतील, बालाजी प्लास्टिक्सच्या तुयेतील, मिस्टिक बॅरेल्झ प्रा. लिमिटेडच्या पिसुर्लेतील, टाइनी टाइड व्हेंचर्सच्या होंड्यातील, प्रदीप तिवारी यांच्या लॉजिस्टिक्स आणि वेअरहाऊसिंग या किटलातील, विजयानंद व्यंकटेश नाईक यांच्या लॉजिस्टिक्स आणि वेअरहाऊसिंग या किटलातील, कॉन्स्ट्रक्स इन्फ्राच्या तुयेतील, रत्नाकर धुमे यांच्या पिसुर्लेतील आणि ह्यूजेस प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या नाकेरी येथील प्रकल्पांचा समावेश आहे.
या सर्व प्रकल्पांमुळे ८०१ नोकऱ्या निर्माण होणार असून, त्यामाध्यमातून राज्याला महसूल मिळण्यासह गोमंतकीय युवक–युवतींना रोजगार मिळण्याचीही आशा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.