Bailpar river project work Dainik Gomantak
गोवा

कासारवर्णे-बैलपार येथे 1 मे रोजी ‘जल-आंदोलन’

नदीचे पाणी इतरत्र वळवले तर पाचशेपेक्षा जास्त बागायतदारांना फटका बसणार

दैनिक गोमन्तक

मोरजी: कासारवर्णे बैलपार नदीवर जलसिंचन खात्यातर्फे 27 कोटी रुपये खर्च करून पंपहाऊस बसवून नदीचे पाणी अन्‍यत्र वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रकार बेकायदा असल्याचा दावा करत कासारवर्णे पंचायतीने जलसिंचन खात्याला हे काम बंद करण्याची नोटीस दिली होती. परंतु त्या नोटिशीला न जुमानता जलसिंचन खात्याने काम युद्धपातळीवर सुरू केल्याने आता स्थानिक शेतकरी संतप्त बनले आहेत. जर सरकारने हे काम बंद ठेवले नाही तर 1 मे रोजी स्थानिक शेतकरी शिवाय मोपा विमानतळ पीडित जनसंघटना ‘जलआंदोलन’ या आगळ्‍यावेगळ्‍या उपक्रमाद्वारे जनआंदोलन छेडतील, असा इशारा देण्‍यात आला आहे. तसे पत्र समितीने उपजिल्हाधिकारी, मामलेदार आणि पेडणे पोलिसांना सादर केले आहे.

जलसिंचन खात्याचे अधिकारी म्हणतात की या पंपहाऊसद्वारे पाणी तिळारी कालव्याला सोडण्यात येणार आहे. या तिळारी कालव्याच्या माध्यमातून पंधरा एमएलडी पाणी हे नवीन चांदेल प्रकल्प विस्तारीकरण सुरू आहे, त्या प्रकल्पाला नेले जाईल. शिवाय पाच एमएलडी पाणी विमानतळ प्रकल्पाला तर 30 एमएलडी पाणी हे नियोजित तुये जलप्रकल्‍पाला देण्यात येणार आहे. त्‍यामुळे स्थानिक शेतकरी अजूनही भयभीत आहे. नदीचे पाणी इतरत्र वळवले तर पाचशेपेक्षा जास्त बागायतदारांना फटका बसणार आहे. त्‍यांची शेती, बागायती नष्‍ट होणार आहे, असा शेतकऱ्यांचा दावा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

SCROLL FOR NEXT