डिचोली 'मासळी' मार्केटातील सांडपाणी उघड्यावर

प्रशासन कुठे: डिचोली शहरात अस्वच्छता, रोगराईच्या भीतीने नागरिक चिंतित
Sewage water in open at fish market of Bicholim
Sewage water in open at fish market of BicholimDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: स्वच्छतेबाबतीत आघाडीवर असलेल्या डिचोली शहरातील मासळी मार्केटजवळ सध्या सांडपाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक रोगराईच्या भितीने चिंतेत आहेत.

मार्केटमधील सांडपाणी उघड्यावर सोडण्यात येत असून हे सांडपाणी मार्केट इमारतीच्या एका कोपऱ्यात साचले आहे. मासळी मार्केटमध्ये ये-जा करणाऱ्या बहूतेक ग्राहकांना या अस्वच्छतेचे दर्शन घडत आहे. असह्य दुर्गंधीमुळे नाक मुठीत धरण्याची पाळी ग्राहकांवर येत आहे. पालिकेचे या अस्वच्छतेकडे लक्ष कसे जात नाही. त्याबद्दल ग्राहक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

Sewage water in open at fish market of Bicholim
किरण कांदोळकर तृणमूल काँग्रेस सोडणार

उपाययोजना करावी

मार्केटजवळच साचलेल्या या घाण पाण्यामुळे परिसरात चिखलमय दलदल निर्माण झाली असून, त्यापासून दुर्गंधी पसरत आहे. या सांडपाण्यात मोठ्या प्रमाणात किडींचीही पैदास झाली आहे. ज्याठिकाणी ही अस्वच्छता निर्माण झाली आहे, तेथेच साप्ताहिक बाजाराच्या दिवशी काही भाजी विक्रेते बसतात. या अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची शक्यता वाढली असून, तशी भीती बाजारात येणाऱ्या ग्राहकांकडून व्यक्त होत आहे. या अस्वच्छतेपासून रोगराई पसरण्याआधीच पालिकेने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com