Accident in Goa Dainik Gomantak
गोवा

Accident in Goa : ...तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही; सांगेत स्थानिकांचा रास्तारोको

रास्तारोकोमुळे काहीकाळ परिसरात तणाव पाहायला मिळाला.

गोमन्तक डिजिटल टीम

Accident in Goa : दाबामळ कोठार्ली येथे ट्रकखाली आल्याने युवकाचा काल बुधवारी 19 ऑक्टोबर रोजी जागीच मृत्यू झाला होता. लवलेश मनोहर च्यारी असं या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे. या अपघाती मृत्यूनंतर आक्रमक झालेल्या जमावाने आज सकाळपासूनच सांगेत रास्तारोको केला. तसंच मंत्र्यांचा ताफाही रोखला. या रास्तारोकोमुळे काहीकाळ परिसरात तणाव पाहायला मिळाला.

दरम्यान स्थानिकांनी अपघातास कारणीभूत असलेल्या पेप्सी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी येईन आमच्या सुरक्षिततेची हमी द्यावी अशी मागणी केली. तसंच जोपर्यंत हमी मिळत नाही तोपर्यंत लवलेश या तरुणाचा मृतदेहही ताब्यान न घेण्याचा पवित्रा स्थानिकांनी घेतला. गुरुवारी सकाळपासूनच रास्तारोको केल्यामुळे मात्र अनेक प्रवाशांची चांगलीच गोची झाली.

याच मार्गाने जाणाऱ्या मंत्री सुभाष शिरोडकर यांनाही स्थानिकांनी रोखलं. तसंच सुभाष फळदेसाई यांनीही घटनास्थळी दाखल होत लवकरात लवकर वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची हमी स्थानिकांना दिली.

लवलेश च्यारी नावाचा तरुण बुधवारी दुपारच्या सुमारास दुचाकीने (GA09 C1628) घरी जात होता. दाबामळ कोठार्ली येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या वळणावर अवजड ट्रक पेप्सी कंपनीच्या दिशेने जात होता. यावेळी वळणावर अचानक समोरून येणाऱ्या ट्रकला पाहून लवलेश गडबडला. त्याचे दुचाकीवरून नियंत्रण सुटून गाडीसह ट्रकखाली आला.

या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. सांगे पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दोनच दिवसांपूर्वी लवलेशने आपला 25 वा वाढदिवस साजरा केला होता. दरम्यान, वळणावर असलेली झाडीझुडपे वेळीच कापली असती तर हा अपघात घडला नसता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. युवकांनी अनेकदा शेळपे औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या वाहनांना गतीला आवर घालण्यासाठी आणि रस्त्याची साफसफाई करण्यासाठी सूचना केली होती. पण कंपनी सामाजिक कार्याला असहकार्य होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT