Protest in Mulgaon against ward restructure in goa Dainik Gomantak
गोवा

प्रभाग फेररचनेवरून मुळगावातील बहुजन समाज आक्रमक

मसुद्यात बदल न केल्यास पंचायतीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा

दैनिक गोमन्तक

डिचोली : गोव्यातील पंचायत निवडणूक प्रभाग फेररचनेवरून मुळगावातील बहुजन समाज आक्रमक झाला आहे. प्रभाग फेररचना पूर्णपणे चुकीची असल्याची तक्रार बहुजन वर्गाकडून करण्यात आली आहे. मसुद्यात बदल न केल्यास पंचायतीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Protest in Mulgaon against ward restructure in goa News Updates)

गोवा (Goa) राज्यातील 186 पंचायतींची निवडणूक होणार असल्याने त्यासाठी पंचायत प्रभागांचा फेररचना मसुदा तयार करण्यात आला आहे. हा मसुदा संबंधित तालुक्यातील निवडणूक नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात 24 फेब्रुवारी ते 2 मार्चपर्यंत लोकांना पाहण्यासाठी तसेच त्यावर सूचना, सुधारणा तसेच दुरुस्ती करण्यासाठी खुला ठेवण्यात आला आहे.

हा पंचायत प्रभाग मसुदा निवडणूक (Election) नोंदणी अधिकाऱ्यांनी तयार केला आहे. काही प्रभागांमध्ये समान मतदारांची संख्या असावी यासाठी काही बदल करण्यात आले आहेत. प्रभाग फेररचनेचे हे काम गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून सुरू होते. त्यासाठी मामलेदार आणि संयुक्त मामलेदार यांची निवडणूक नोंदणी अधिकारी तर अव्वल कारकून व मुख्य कारकून यांची सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान या फेररचनेमुळे पंचायत निवडणुकीतील आरक्षण (Reservation) प्रक्रियेला गती मिळण्याचीही शक्यता आहे. यापूर्वी 2017 साली झालेल्या पंचायत निवडणुकीत 540 मतदारसंघ अनुसूचित जाती/जमाती तसेच इतर मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवले होते, शिवाय सर्वसाधारण प्रवर्गातील 323 प्रभागांसह 490 प्रभाग महिलांसाठी राखीव होते. एकूण 1450 प्रभागांसाठी निवडणूक झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT