राज्यात वाजणार पंचायत निवडणुकीचे पडघम, प्रभाग फेररचना पूर्ण

186 पंचायतींचा कार्यकाळ येणार 13 जून रोजी संपुष्टात
Goa Panchayat Elections
Goa Panchayat ElectionsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राज्यातील विधानसभा निवडणुकांचा धूरळा उडाल्यानंतर आता सगळ्यांचे लक्ष 10 मार्च रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे लागले आहे. तर यादरम्यान राज्यातील 186 पंचायतींचा कार्यकाळ ही 13 जून रोजी संपुष्टात येत असल्याने पंचायत निवडणुकीचे पडघम ही वाजायला सुरूवात होईल. विशेष म्हणजे राज्यातील 186 पंचायतींच्या (Panchayat) प्रभाग फेररचनेचे काम राज्य निवडणूक आयोगाकडून पूर्ण झाले असून अनेकांनी आपा-आपल्या परीने गाठीभेटींवर भर देत निवडणूकीसाठी शड्डू ठोकला आहे. तर तयार झालेला मसूदा नागरिकांच्या सूचना आणि हरकतींसाठी 24 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत खुला करण्यात येणार आहे.

यादरम्यान येणाऱ्या सूचना आणि हरकतींचा आयोगाकडून (Election Commission) विचार केला जाईल. त्या सूचना आणि हरकती 8 मार्चपूर्वी प्रभाग फेररचनेत घेण्यात येतील आणि त्या मसूद्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल. यानंतर आरक्षणाचे काम हाती घेणार घेतले जाईल, अशी माहिती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली. असे झाले तर जूनच्या पहिल्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे.

Goa Panchayat Elections
मोपा विमानतळ झाल्यावर गोव्याच्या पर्यटनाला चालना मिळेल!

गेल्या वेळी नगरविकास खात्याने केलेल्या प्रभाग फेररचनेला विविध मतदारसंघांतील काही जणांनी आक्षेप घेतला होता. तर याबाबत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावेळी पालिका तसेच पंचायत निवडणुकांसाठीची फेररचना आणि आरक्षण प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगानेच करून निवडणुकीत पारदर्शकता आणावी, असे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे फेररचनेचे काम राज्य निवडणूक आयोगाकडे देण्यात आले आहे.

मागील निवडणूकीचा विचार केला असता एकूण 1450 प्रभागांसाठी निवडणूक झाली होती. त्यावेळी 540 मतदारसंघ अनुसूचित जाती/जमाती तसेच इतर मागासवर्गीयांसाठी राखीव सर्वसाधारण प्रवर्गातील 323 प्रभागांसह 490 प्रभाग महिलांसाठी राखीव होते. तर यावेळी एकूण 7.49 लाख मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. त्यावेळी भाजप, काँग्रेस, आप या पक्षांनी आपला पाठींबा उमेदवारांना पाठिंबा दिला होता. पण आताचे राजकीय वाहणारे वारे पाहता काही राजकीय पक्ष पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे.

अनेकांकडून मोर्चे बांधणी सुरू

एकीकडे राज्याचे लक्ष 10 मार्च रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे लागले असतानाच आता राज्यात पंचायत निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपासूनच अनेक इच्छुकांनी पंचायत निवडणुकीसांठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com