formula 4 goa street race Dainik Gomantak
गोवा

Goa Street Race Mopa: ‘गोवा स्ट्रीट रेस’ रद्द करा! नागरिकांची आक्रमक भूमिका; गोवा कूळ-मुंडकार संघटनेचे पेडण्यात धरणे आंदोलन

Mopa Airport Goa Street Race: ॲड. जितेंद्र गावकर यांनी सांगितले की, मोपा विमानतळ जीएमआर कंपनीकडे असताना गोवा सरकारला तेथे अशाप्रकारची स्पर्धा आयोजित करण्याचा अधिकार नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Mopa Street Race Protest : मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दि. १४ व १५ फेब्रुवारी रोजी सरकारतर्फे आयोजित करण्यात येणारी ‘गोवा स्ट्रीट रेस’ (फॉर्म्युला ४) ही स्पर्धा तात्काळ रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी गोवा कुळ मुंडकार संघटनेतर्फे पेडणे येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी स्पर्धा रद्द करण्याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.या धरणे आंदोलनात गोवा कूळ-मुंडकार संघटनेचे समन्वयक दीपेश नाईक, पेडणे तालुका नागरिक समितीचे अध्यक्ष नितीन पटेकर, नामदेव तुळसकर, सूर्या साळगावकर, ॲड. जितेंद्र गावकर, संदीप कांबळी, नारायण गडेकर, गोवा ग्रीन संघटनेचे कार्यकर्ते आगुस्तीन मिरांडा, उदय महाले, संतोष मांद्रेकर तसेच सामाजिक कार्यकर्ते आलेक्स नोरोन्हा आदी सहभागी झाले होते.

ॲड. जितेंद्र गावकर यांनी सांगितले की, मोपा विमानतळ जीएमआर कंपनीकडे असताना गोवा सरकारला तेथे अशाप्रकारची स्पर्धा आयोजित करण्याचा अधिकार नाही. तसेच विमानतळ परिसरात इंधन साठवण टाक्या असल्याने या स्पर्धेमुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

नोकऱ्यांची आश्वासने देऊन फसवणूक

दीपेश नाईक यांनी सांगितले की, मोपा परिसरातील सहा पंचायतींतील शेतकऱ्यांची जमीन अत्यल्प दरात विमानतळासाठी घेतली गेली असून आज त्या जमिनींची किंमत शंभरपटीने वाढली आहे. नोकऱ्यांची आश्वासने देऊन सरकारने स्थानिकांची फसवणूक केली असून, शेतकऱ्यांना विमानतळ प्रकल्पात भागीदारही करण्यात आलेले नाही. केवळ विमानतळासाठी दिलेल्या जमिनीवर कराराचा भंग करून पंचतारांकित हॉटेल व आता फॉर्म्युला ४ स्पर्धा आयोजित केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

SCROLL FOR NEXT