Formula 4 Racing Goa: ‘मोपा’वर रंगणार ‘फॉर्म्युला 4 रेसिंग थरार! ट्रॅक’ उभारणीसाठी हालचाली; 4 कोटींचा खर्च अपेक्षित

Goa Mopa Formula 4 Racing: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वर्क्स डिव्हिजन सात (राष्ट्रीय महामार्ग), पणजी कार्यालयामार्फत यासाठी ऑनलाईन टक्केवारी दर पद्धतीने निविदा मागविण्यात आल्या आहेत.
 Goa Mopa Formula 4 Racing
Goa Mopa Formula 4 RacingDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मोपातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यावर होणाऱ्या फॉर्म्युला ४ रेसिंग कार शर्यतीच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वर्क्स डिव्हिजन सात (राष्ट्रीय महामार्ग), पणजी कार्यालयामार्फत यासाठी ऑनलाईन टक्केवारी दर पद्धतीने निविदा मागविण्यात आल्या आहेत.

निविदा सूचनेनुसार, या कामात मोपा, विमानतळ रस्त्यावर २.१ किलोमीटर लांबीचा फॉर्म्युला ४ रेस ट्रॅक उभारण्याचा समावेश आहे. यासोबतच रेस ट्रॅकच्या उभारणीस अडथळा ठरणाऱ्या विविध सेवा-सुविधांचे (वीज वाहिन्या, पाणीपुरवठा लाईन्स, दूरसंचार केबल्स आदी) स्थलांतर करण्याचे कामही या प्रकल्पाचा भाग आहे.

 Goa Mopa Formula 4 Racing
Mopa Taxi Protest: मोपावरचे जाचक धोरण! टॅक्‍सीचालकांची मुख्‍यमंत्र्यांच्‍या निवासस्‍थानी धडक; CM सावंतांची शिष्टमंडळाशी चर्चा

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा अंदाजे खर्च ₹ ४ कोटी ३२ लाख ७६,४२६ रुपये २५ पैसे इतका निश्चित करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे, ही कामे अत्यंत कालमर्यादित असून ती वेळेत पूर्ण करणे अनिवार्य असल्याचे निविदा दस्तऐवजात नमूद केले आहे.

 Goa Mopa Formula 4 Racing
Mopa Airport: 2 ते 5 मिनिटांचा नियम जाचक! टॅक्सीचालकांत संताप; मोपा विमानतळावर ‘जीएमआर’च्या नव्या धोरणामुळे गोंधळ

मिळेल नवी ओळख

दरम्यान, राज्य सरकारकडून आंतरराष्ट्रीय मोटरस्पोर्ट्स स्पर्धांचे आयोजन करण्यावर भर दिला जात असून, फॉर्म्युला ४ रेसमुळे गोव्याच्या पर्यटनाला, विशेषतः उत्तर गोव्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com