GIDC Womens Hostel Dainik Gomantak
गोवा

Womens Hostel: औद्योगिक वसाहतीत होणार 5 महिला वसतिगृहे, ‘GIDC’कडून केंद्राला अहवाल सादर

GIDC Womens Hostel: केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या भांडवली गुंतवणूक २०२४-२५ योजनेसाठी राज्यांना विशेष सहाय्य अंतर्गत वसतिगृहे बांधण्यासाठी निधी मिळण्याची ‘जीआयडीसी‘ला आशा आहे.

Sameer Panditrao

GIDC Womens Hostel Proposal

पणजी: गोवा औद्योगिक विकास महामंडळाने (जीआयडीसी) औद्योगिक वसाहतींमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी पाच वसतिगृहे उभारण्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्राला नुकताच सादर केला आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मार्गाने औद्योगिक वसाहतींत कार्यरत महिलांसाठी पाच वसतिगृहे उभारण्याची सरकारची योजना आहे.

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या भांडवली गुंतवणूक २०२४-२५ योजनेसाठी राज्यांना विशेष सहाय्य अंतर्गत वसतिगृहे बांधण्यासाठी निधी मिळण्याची ‘जीआयडीसी‘ला आशा आहे. या प्रकल्पांचा डीपीआर (तपशीलवार प्रकल्प अहवाल) तयार करण्यात आला होता, आणि वित्त विभागाने तो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात केंद्राकडे पाठवला आहे.

‘जीआयडीसी‘ला वेर्णा येथे दोन आणि मडकई, तुये आणि कुंकळ्ळी येथे प्रत्येकी एक वसतिगृहे कार्यरत महिलांसाठी बांधायची आहेत. राज्य सरकारला आशा आहे की वसतिगृहांचा फायदा औद्योगिक क्षेत्रात, विशेषतःफार्मासी क्षेत्रात रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांना होणार आहे.

जीआयडीसीने केंद्राकडे या वसतिगृहासाठी शंभर कोटी रुपये मागितले आहेत. ‘जीआयडीसी’ने वसतिगृहे उभारले जाऊ शकतील, असे भूखंडदेखील निश्चित केले आहेत. वसतिगृहांची उभारणी झाल्यानंतर ते ३० वर्षांसाठी भाडेतत्वावर वसतिगृहांची देखभाल व संचालन करण्याचे कंत्राट दिले जाणार आहे. औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहे बांधल्याने अनुकूल परिसंस्था निर्माण होणार आहे. ज्यामुळे महिला श्रमशक्ती सहभाग दर (एलएफपीआर) वाढणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

Middle East War: "युद्ध तुम्ही लादलं, खर्चही तुम्हीच द्या''! युएईची अमेरिकेला थेट तंबी; डॉलर सोडून चिनी 'युआन'कडे वळण्याचा दिला इशारा

SCROLL FOR NEXT