GIDC: 'आयडीसी'तले रस्ते बनणार ‘व्हाइट टॉपिंग’ने चकाचक! आठ औद्योगिक वसाहतींमध्ये होणार प्रथम वापर

White topping technology roads: आयडीसीने राज्यातील आठ औद्योगिक वसाहतींमधील रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी अत्याधुनिक व्हाइट टॉपिंग तंत्रज्ञान राबविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
White topping technology roads
White topping technology roads idcDainik Gomantak
Published on
Updated on

White Topping Technology Roads in Goa

पणजी: औद्योगिक विकास महामंडळाने (आयडीसी) राज्यातील आठ औद्योगिक वसाहतींमधील रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी अत्याधुनिक व्हाइट टॉपिंग तंत्रज्ञान राबविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने खराब झालेल्या डांबरी रस्त्यांवर उच्च दर्जाचे ६ इंच जाडीचे काँक्रिट घालण्यात येईल.

या प्रकल्पाचे उद्‍घाटन आयडीसीचे अध्यक्ष आलेक्स लॉरेन्स रेजिनाल्ड आणि व्यवस्थापकीय संचालक प्रविमल अभिषेक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या प्रकल्पाची जबाबदारी मेसर्स केकेबी इंजिनिअरिंग अॅण्ड कन्स्ट्रक्शन्स प्रा. लि.ला दिली आहे.

White topping technology roads
Honda IDC: अनेकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी बनलेली सत्तरीतील 'ती औद्योगिक वसाहत पडलीये ओसाड

जागतिक दर्जाचे रस्ते तयार करण्याचा पुरावा

आयडीसीचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड म्हणाले की, औद्योगिक क्षेत्रासाठी जागतिक दर्जाचे रस्ते तयार करण्याची आमची वचनबद्धतेचा पूर्ण करण्याचा पुरावा म्हणजे व्हाइट टॉपिंग तंत्रज्ञान आहे. या उपक्रमामुळे औद्योगिक क्षेत्राला दर्जेदार पायाभूत सुविधा मिळतील तसेच उद्योगांच्या कार्यक्षमतेला चालना देखील मिळेल.

White topping technology roads
Cuncolim IDC: कुंकळ्ळीच्या लोकांना मोकळा श्वास घेऊ द्या, प्रदूषणकारी कारखाने बंद करा! LOP युरींचे CM सावंतांना साकडे

चार टप्प्यांत होणार काम

पहिला टप्पा : होंडा आणि पिळर्ण औद्योगिक वसाहत.

दुसरा टप्पा : वेर्णा आणि मडगाव औद्योगिक वसाहत.

तिसरा टप्पा : बेतोडा औद्योगिक वसाहत.

चौथा टप्पा : काणकोण, काकोडा आणि कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com