Goa Land Auction: उद्योजकांसाठी सुवर्णसंधी, 29 भूखंडांचा होणार 1 जानेवारीला लिलाव; GIDC ची घोषणा

Aleixo Reginaldo: औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्व सेवा आता ऑनलाईन केल्या गेल्या असून महामंडळाच्या ‘ओपन’ या पोर्टलसाठी आता उद्योगांना सर्व आवश्यक माहिती द्यावी लागणार आहे.
open portal inaugaration gidc
Aleixo ReginaldoDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्व सेवा आता ऑनलाईन केल्या गेल्या असून महामंडळाच्या ‘ओपन’ या पोर्टलसाठी आता उद्योगांना सर्व आवश्यक माहिती द्यावी लागणार आहे. माहिती दिली नाही, तर त्यांना भविष्यात ऑनलाईन सेवा मिळणार नाही, असे सांगत गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे (जीआयडीसी) चेअरमन आलेक्स रेजिनाल्ड यांनी २० औद्योगिक व व्यावसायिक ९ अशा २९ भूखंडांचा लिलाव १ जानेवारी २०२५ पासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले.

जीआयडीसीने शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रेजिनाल्ड बोलत होते. जीआयडीसीने ‘ओपन’ (एंटरप्राईझ नेटवर्कसाठी ओपन प्लॅटफॉर्म) हे पोर्टल लाँच केले. याप्रसंगी व्यवस्थापकीय संचालक प्रविमल अभिषेक यांची उपस्थिती होती.

रेजिनाल्ड म्हणाले, भूखंड लिलावामुळे औद्योगिक आणि व्यावसायिक उपक्रमांच्या स्थापनेसाठी अतुलनीय संधी उपलब्ध होणार आहे. नवीन पोर्टल कामातील पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी डिझाइन केलेले आहे. इच्छुक गुंतवणूकदारांसाठी ही प्रक्रिया सुव्यवस्थित असणार आहे. इच्छुकांसाठी या प्रमुख भूखंडांसाठी अर्ज करणे आणि बोली लावणे पूर्वीपेक्षा सोपे होणार आहे.

open portal inaugaration gidc
Tanvi Vasta Case: '१० टक्‍के कमिशन'ने सुरूवात, तपासात उलगडला तन्वीचा फसवणुकीचा पॅटर्न, घोटाळ्यांची संख्या 25 वर

आॅनलाइन सेवा देणारे गोवा पहिले

अभिषेक म्हणाले की, ‘ओपन’ या पोर्टलवर राज्यातील विविध उद्योग, त्यांचे उत्पादन, कामगार अशी विविध स्वरूपाची माहिती देण्यात आली आहे. हे उद्योगांसाठी समर्पित असणारे देशातील पहिले ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. यावर उद्योगांशी संबंधित सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. भूखंड लिलाव, परवाना वा अन्य शुल्क भरणे व इतर मंजुऱ्यांही पोर्टलवर उपलब्ध करून दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com