AAP
AAP  Dainik Gomantak
गोवा

घोषणाबाजी म्हणजे विकास नव्हे; परिवर्तन यात्रेत 'आप'चे नोनू नाईक कडाडले

दैनिक गोमन्तक

खांडोळा: प्रियोळ मतदारसंघात अनेक ठिकाणी विकास कामांसाठी भूमिपूजन करण्यात आले आहे, पण फक्त भूमिपूजन, घोषणाबाजी म्हणजे विकास (Development) नव्हे. भूमिपूजन झाले, पण विकास कामांची अद्याप सुरुवात झालेली नाही. ही जनतेची फसवणूक आहे, असे मत आपचे (AAP) नेते नोनू नाईक यांनी वळवई, माशेलातील परिवर्तन यात्रेत व्यक्त केले.

प्रियोळ मतदारसंघातील (Constituency) आपचे नेते नाईक यांनी बाणास्तरी, माशेल, खांडोळा, वळवई परिसरात आपची ध्येय, धोरणे आणि मतदारसंघातील रखडलेली कामे यासंदर्भात परिवर्तन यात्रेत आढावा घेतला. त्यांच्यासमवेत आपचे नेते तथा कलाकार राजदीप नाईक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्वसामान्यांच्या विकासासाठी आम आदमीपक्ष गोव्यात (Goa) विधानसभा निवडणूक लढविणार आहे. वीज, पाणी, रस्ते या समस्या कायमच्या सोडविण्यासाठी आपचा प्रयत्न राहाणार असून युवकांना रोजगार मिळवून देणार आहे. स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी आपच देऊ शकते, असेही नाईक म्हणाले.

परिवर्तन यात्रेत केजरीवाल यांनी केलेल्या घोषणाबद्दल माहित दिली. रोजगार, बेकारी भत्ता, गृहिणींना आधार, तीर्थयात्रा, मोफत वीज, पाणी याबाबत नोंदणी करण्याचेही यावेळी आवाहन करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT