पत्रव्यवहार झाला मात्र, त्यांचा काडीचाही उपयोग झाला नाही : आल्मेदा

एवढ्या समस्‍यांच्‍या गर्तेत हे केंद्र सापडले असल्‍याची टीका सरपंच पेट्रीक सावियो आल्मेदा यांनी केली. स्‍थानिक आमदाराचेही आरोग्‍य केंद्राच्‍या परिस्‍थितीकडे दुर्लक्ष झाले आहे.
Health Center
Health CenterDainik Gomantak

शिवोली : हणजूण-कायसूव (Siolim) पंचायत क्षेत्रातील वागातोर येथील आरोग्य उपकेंद्र (Health Center) अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. रुग्‍णांवर उपचार करण्यापेक्षा सध्या आरोग्‍य केंद्राच्‍या दर्जाबाबत उपचार करून घेण्याची वेळ आली आहे. एवढ्या समस्‍यांच्‍या गर्तेत हे केंद्र सापडले असल्‍याची टीका सरपंच पेट्रीक सावियो आल्मेदा यांनी केली. स्‍थानिक आमदारांचेही आरोग्‍य केंद्राच्‍या परिस्‍थितीकडे दुर्लक्ष झाले आहे.

Health Center
शिरोड्यात कोण ठरणार ? 'मुकद्दर का सिकंदर'

गेल्या दहा-बारा वर्षांपासून या भागात कार्यरत असलेल्या स्थानिक उपआरोग्य केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी विद्यमान आमदार तसेच माजी मंत्री विनोद पालयेकर (Former Minister Vinod Palayekar) यांच्‍याशी आपण अनेकवेळा पत्रव्यवहार केला. मात्र, त्यांचा काडीचाही उपयोग झाला नाही. त्यामुळेच येथील उपआरोग्य केंद्र समस्यांचे आगर बनल्याचे आल्मेदा यांनी उपस्थित प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

अनेक समस्यांचे आगार बनलेल्या येथील केंद्राची एकतर लवकरात लवकर क्षमता वाढवावी, अन्यथा येथील केंद्राला कायमचे टाळे ठोका, अशी उपहासात्‍मक प्रतिक्रिया ग्रामस्‍थांनी दै. ‘गोमन्‍तक’कडे बोलताना व्‍यक्त केली. पर्यटनदृष्‍ट्या महत्त्‍व असलेल्‍या वागातोर परिसरातील उपआरोग्य केंद्राकडे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी प्रामुख्याने लक्ष देऊन या केंद्राचा दर्जा वाढवावा.

- पेट्रीक सावियो आल्‍मेदा, सरपंच वागातोर

Health Center
पट्टेरी वाघाच्या अस्तित्वावर पुन्हा शिक्कामोर्तब

आपत्‍कालीनप्रसंगी ठरतेय कुचकामी?

हणजूण कायसूव पंचायत क्षेत्रातील वागातोर हा भाग किनारी परिसरात येत असल्याने या भागात शेकडो देशी तसेच विदेशी पर्यटकांची वर्दळ असते. त्यांच्या सोयीसाठी तारांकित हॉटेल्सपासून ते सर्वसाधारण छोटी-मोठी अनेक रेस्टॉरंट्स दिवसा-रात्री याभागात कार्यरत असतात. त्यामुळे या भागात छोटे-मोठे अपघात होणे नित्याचाच प्रकार असतो. किनारी भागात पर्यटकांसाठी उपलब्ध असलेल्या बोटींगच्या सेवेत कर्मचाऱ्यांकडून थोडीफार चूक झाली तरी समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्‍यू होण्‍याचे तसेच अन्य जीवावर बेतणारे अनेक अपघात याभागात सर्रासपणे घडत असतात.

रुग्‍णांचा हकनाक बळी!

वागातोर समुद्रात दुर्घटना झाल्‍यास बुडणाऱ्या व्यक्तीवर त्‍वरित उपचार करण्यासाठी त्याला सर्वप्रथम वागातोर येथील स्थानिक आरोग्य उप केंद्रावर आणले जाते. मात्र तेथे उपचारांच्या प्रमुख सोयी उपलब्ध नसल्याने रुग्‍णाची परिस्‍थिती बिकट बनते. गंभीर अवस्थेत रुग्‍णाला शिवोलीतील मुख्य आरोग्य केंद्रावर पाठविले जाते. तोपर्यंत बराच वेळ गेलेला असतो. त्यामुळे अनेकदा रुग्‍णाला योग्य उपचाराविना जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना ताज्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com