Margao Municipality Dainik Gomantak
गोवा

मडगाव पालिकेतील मान्सूनपूर्व कामांची प्रक्रिया थंडावली

मडगावात नगरसेवक नाराज: कंत्राटी कामगारांची भरती रखडल्याने समस्येत भर

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: मडगाव पालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व कामांची प्रक्रिया मार्चमध्ये सुरू होते. मात्र यंदा ती पंधरवडा उलटूनही सुरू झालेली नाही. गटारे तंुबण्यासारख्या पावसाळ्यात उद्‌भवणाऱ्या समस्या वेळीच सुटणार का,असा सवाल मडगाववासीयांतून विचारला जात आहे.

दर पावसाळ्यात अनेक ठिकाणी गटारे तुंबण्याचे प्रकार घडतात. यासाठी पालिकेकडून गटारांची स्वच्छता पावसाळ्यापूर्वी तीन ते चार महिन्यांआधी करण्यात येते. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कामाला प्रत्यक्षात सुरवात होते.

मात्र, त्याची प्रक्रिया मार्च महिन्यात सुरू होते, असे मडगावचे मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी सांगितले होते. मात्र, या महिन्याचा पंधरवडा उलटला तरी प्रत्यक्षात या प्रक्रियेला सुरुवात केली नसल्याने नगरसेवकांसह नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

याविषयी प्रभाग 15 चे नगरसेवक महेश आमोणकर म्हणाले, की माझ्या प्रभागात या कामाला यापूर्वीच सुरुवात झाली आहे. पालिकेकडून कामगार मिळत असले तरी ते अपुरे आहेत. पावसाळ्यात लोकांना त्रास होऊ नये त्यामुळे खासगी कामगार घेऊन येथील गटार स्वच्छतेचे काम करण्यात येत आहे. प्रभाग 19 च्या नगरसेविका लता पेडणेकर म्हणाल्या, रोटेशनने मिळणाऱ्या कामगारांच्या मदतीने प्रभागात गटार सफाई करण्यात आली आहे.

खासगी कामगारांकडून काम

पावसाळ्यात गटारात साचलेला कचरा आणि माती न उपसल्यास शहरातील रस्त्यांवर पाणी साचण्याचे तसेच दुकान आणि घरांत पाणी शिरण्याचे प्रकार घडतात. हे घडू नये, यासाठी मान्सून सुरू होण्यापूर्वी तीन महिने अगोदर या कामाला सुरवात करण्यात येते. तसेच या कामासाठी रोजंदारीवर कामगारांची नेमणूक करण्यात येते. हे कामगार भरती करण्याची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे काही नगरसेवकांनी पावसाळ्यात जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून खासगी कामगार घेऊन आपल्या प्रभागात कामाला सुरुवात केली आहे.

विधानसभेची आचारसंहिता सुरु असल्याने काही दिवसांपूर्वी कामगारांची भरती रखडली होती. असे असले तरी मिळतील ते कामगार घेऊन पाजीफोंड परिसरातील गटारांची सफाई करण्यात आली आहे. हे काम लवकरात लवकर आटोपते घेण्यासाठी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांनी लक्ष घालायला हवे.

- राजू नाईक, नगरसेवक

पालिकेकडून 10 ते 15 दिवसांनंतर रोटेशन पद्धतीने मिळणाऱ्या दोन-तीन कामगारांच्या मदतीने पावसाळ्यापूर्वी संपूर्ण प्रभागातील नाला, गटार सफाईचे काम पूर्ण होणे अशक्य आहे. सध्या मिळणाऱ्या कामगारांच्या साहाय्याने माडेल परिसरातील गटारांची सफाई करण्यात आली. पूर्ण काम होण्यासाठी आणखी कामगारांची आवश्‍यकता आहे.

- फ्रान्सिस जोनास, नगरसेवक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT