National Games 2023 Dainik Gomantak
गोवा

National Games 2023 Goa: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्‍घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गोव्यात

National Games 2023 Goa: स्पर्धा उद्घाटन सोहळा : कात्या कुएल्हो मशालवाहक

दैनिक गोमन्तक

National Games 2023 Goa: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्‍घाटन सोहळ्यात 600 कलाकार राष्ट्रीय एकात्मतेवर आधारीत कलाकृती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादर करणार आहेत.

स्पर्धेची ज्योत पंतप्रधानांकडे सुपूर्द करण्यासाठी गोव्याकडून आंतरराष्ट्रीय पातळीवरील विंडसर्फर कात्या कुएल्हो हिची निवड केली आहे. 12 हजार जणांच्या साक्षीने हा सोहळा फातोर्डा येथील पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर रंगणार आहे.

26 रोजी पाच तास चालणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्‍घाटन सोहळ्यासाठी महान धावपटू व भारतीय ऑलिंपिक संघटनेची अध्यक्ष पी. टी. उषा गोव्यात दाखल झाली असून उद्या केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, वेटलिफ्टर मीराबाई चानू येणार आहेत.

याशिवाय अरुणालप्रदेश, आसाम आणि ओडिशाच्या क्रीडामंत्र्यांनी उद्‍घाटन सोहळ्याला येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज मंत्रालयात या स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतला. बैठकीत विविध खातेप्रमुखांसह राज्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे, मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल. क्रीडा सचिव श्वेतिका सचन सहभागी झाल्या होत्या.

या बैठकीत विविध ठिकाणच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. पत्रादेवी, मोले, पोळे आदी सीमांवर खेळाडूंचे स्वागत करण्याची जबाबदारी कशी पार पाडण्यात आली, याविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.

सुमारे १० हजार खेळाडू आणि ५ हजार अन्य मिळून १५ हजार जण या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यात दाखल होत आहेत. त्यांच्या राहण्याची व्यवस्था, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्था यांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

कांपाल येथील क्रीडानगरीत २८ नोव्हेंबरपासून दररोज सायंकाळी करमणुकीचे कार्यक्रम सादर करण्याचे नियोजनही या बैठकीत करण्यात आले.

या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की पंतप्रधान २६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्टेडियममध्ये आले की राज्यवार खेळाडू संचलन करून मानवंदना देतील, त्यानंतर ध्वजारोहण करून क्रीडाज्योत प्रज्वलित केली जाईल. यावेळी पंतप्रधानांव्यतिरीक्त क्रीडामंत्री व मुख्यमंत्र्यांचे भाषण होणार आहे.

उद्‍घाटन सोहळ्यासाठी पाच हजार विद्यार्थी येणार आहेत. सात हजार जणांची आणखीन बैठक व्यवस्था आहे. प्रत्येकाने दुपारी साडेचार वाजण्यापूर्वी स्टेडियममध्ये दाखल होणे आवश्यक आहे. सरकारने आमदार, सरपंच यांच्‍या माध्यमातून जनतेसाठी निमंत्रण पत्रिका उपलब्ध केल्या आहेत.

निमंत्रण पत्रिकेशिवाय स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार नाही. निमंत्रण पत्रिका मिळाली नसल्यास तशा व्यक्तीने ओळखपत्र दाखवून क्रीडा खात्याच्या कार्यालयातून ती घ्यावी.

कोणाही इच्छुक गोमंतकीय उद्‍घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्यापासून वंचित राहू नये अशी सरकारची इच्छा आहे.

पंतप्रधान येणार असल्याने सुरक्षा व्यवस्था असेल हे गृहीत धरून प्रत्येकाने शक्य तितक्या लवकर कार्यक्रमस्थळी पोचण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. वाहनांची पार्किंगची व्यवस्था केलेल्या ठिकाणीच वाहन ठेवून चालत स्टेडियमच्या ठिकाणी यावे लागणार आहे.

हेमा सरदेसाई यांचा संगीताचा कार्यक्रम

हेमा सरदेसाई आणि सुखविंदरसिंग यांचा संगीताचा कार्यक्रम हे उद्‍घाटन सोहळ्याचे वैशिष्ट्य असेल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, गोमंतकीय कला संस्कृतीचे दर्शन घडवणारे कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत.

दुपारी चार वाजल्यापासून विविध कलादर्शनाचे कार्यक्रम स्टेडियममध्ये सुरू असतील. पंतप्रधान रात्री ८.३० वाजता निघाल्यानंतरही हे कार्यक्रम सुरू राहतील.

कात्या कुएल्हो हिचा असाही सन्मान

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची मशाल पंतप्रधानांकडे सुपूर्द करण्यासाठी गोव्याकडून आंतरराष्ट्रीय पातळीवरील विंडसर्फर कात्या कुएल्हो हिची निवड केली आहे.

दोन खेळाडू ही मशाल पंतप्रधानांकडे सुपूर्द करतात. त्यापैकी एका खेळाडूचे नाव भारतीय ऑलिंपिक संघटना निश्चित करते, तर दुसऱ्या खेळाडूचे नाव आयोजक राज्य सरकार करते.

खेळाडूंसाठी तातडीची वैद्यकीय सुविधा : क्रीडा स्पर्धा आयोजन ठिकाणच्या परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, सामाजिक आरोग्य केंद्रे, सरकारी इस्पितळांत २४ तास तातडीची वैद्यकीय सेवा खेळाडूंसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.

गोमेकॉत न्युरोसर्जनची सेवाही याच धर्तीवर आरक्षित ठेवली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT