Navratri 2023: खेळाडूंसाठी एकाग्रता, सराव महत्त्वाचा !

Navratri 2023: कोणत्याही खेळात टिकून राहण्यासाठी सरावाची गरज असते. सरावासह बुद्धिबळात एकाग्रता महत्त्वाची, असे वुमन ग्रँड मास्टर तथा अर्जुन पुरस्कार विजेती भक्ती कुलकर्णी हिने सांगितले. ‘गोमन्तक तनिष्का’ आणि ‘गोमन्तक टीव्ही’च्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नवतेजस्विनी’शी संवादमध्ये ती बोलत होती.
Navratri 2023
Navratri 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Navratri 2023: बुद्धिबळ क्रीडा प्रकारात गोव्याला जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवून देणारी गोव्याची दिग्गज बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी हिने आपल्या यशाचे श्रेय तिचे पालक आणि प्रशिक्षक रघुनंदन गोखले यांना दिले आहे. भक्ती म्हणते की, खेळाडूंसाठी एकाग्रता, सराव आणि व्यायाम सर्वात महत्त्वाचा असतो.

Navratri 2023
Goa Crime News: गोळीबार संशयित डिसोझाने पासपोर्ट पोलिसांना द्यावा!

‘गोमन्तक तनिष्का’ व्यासपीठतर्फे आयोजित ‘नव तेजस्विनींशी’या कार्यक्रमाअंतर्गत ज्योती कुंकळकर आणि मनस्विनी प्रभुणे नायक यांनी सोमवारी बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी हिच्याशी संवाद साधला.

अर्जुन पुरस्कार विजेती दिग्गज बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी म्हणाली, की तिने वयाच्या दुसऱ्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली होती. तिचे वडील बुद्धिबळपटू असून आपल्या मुलीनेही बुद्धिबळात प्राविण्य मिळवावे, अशी त्यांची इच्छा होती म्हणून त्यांनी तिला खेळायला शिकवले. गोव्यात आणि विदेशातही विविध बुद्धिबळ स्पर्धांमध्ये सहभागासाठी आई-वडिलांनी प्रोत्साहित केले. वयाच्या चौथ्या वर्षी बांबोळी येथे पहिली स्पर्धा खेळून सुवर्णपदक जिंकली. महिला नूतन शाळेतील शिक्षकांनीही सदोदित पाठिंबा दिला, असे तिने सांगितले.

Navratri 2023
Sand Extraction: रेती उपसा परवाने लांबणीवर

भक्ती म्हणाली की, तिचा पहिला राष्ट्रीय बुद्धिबळ खेळ गुजरातमध्ये होता जेव्हा ती केवळ ७ वर्षांची होती. २००६ मध्ये तिने इराणमध्ये तिने पहिली आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. ती म्हणते की, बुद्धिबळ स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी तिने आजवर सुमारे ५० देशांचा प्रवास केला आहे. तिला तिच्या पालकांना परदेशात सुट्टीसाठी घेऊन जाण्याची इच्छा असल्याचेही तिने सांगितले.

क्रीडा प्रवासात आलेल्या काही संस्मरणीय क्षणांबद्दल विचारले असता, भक्तीने सांगितले की, राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्कार मिळालेला क्षण तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बुद्धिबळ ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांच्यासोबत फोटो शेअर करण्याची मिळालेली संधी हे दोन्ही क्षण अविस्मरणीय.तिने असेही नमूद केले की, २००८ ते २०२० पर्यंत उद्योगपती श्रीनिवास धेंपो यांनी तिला पाठिंबा दिला आणि स्थानिक माध्यमांनीही तिला प्रसिद्धी दिली.

राज्य सरकारने क्रीडापटू म्हणून सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आजपर्यंत सरकारी नोकरी मिळाली नसल्याची खंत भक्तीने बोलून दाखवली.

बुद्धिबळ कोचिंग अकादमी सुरू करणार !

बुद्धिबळाच्या भविष्यातील तिच्या योजनांबद्दल विचारले असता, भक्तीने सांगितले की ती ऑनलाईन बुद्धिबळ प्रशिक्षण देत आहे. पुढील 3 वर्षांत ती स्वतःची बुद्धिबळ कोचिंग अकादमी सुरू करणार आहे. ती म्हणाली की, खेळात एक मोठा गैरसमज आहे की, पुरुष महिलांना पराभूत करू शकतात परंतु ते खरे नाही. मी खुल्या गटात भाग घेतला आहे आणि अनेक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्या आहेत. मला असे वाटते, की बुद्धिबळ स्पर्धांमध्ये महिलांची बक्षिसे पुरुषांच्या स्पर्धेइतकीच असली पाहिजेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com