Vegetable Price In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Vegetable Rates: वाढत्या महागाईमुळे ऐन हिवाळ्यात नागरिकांची होरपळ! टोमॅटो,लसणाच्या दरात पुन्हा वाढ, कडधान्येही भडकली

Vegetable Price Hike: गेल्‍या काही दिवसांपासून राज्‍यात भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. त्‍यामुळे सर्वसामान्‍यांचे विशेषत: गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. अगोदरच महागाईच्‍या वणव्‍यात होरपळणारे लोक आता आणखी होरपळू लागले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Vegetables Price Hike In Goa

पणजी: गेल्‍या काही दिवसांपासून राज्‍यात भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. त्‍यामुळे सर्वसामान्‍यांचे विशेषत: गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. अगोदरच महागाईच्‍या वणव्‍यात होरपळणारे लोक आता आणखी होरपळू लागले आहेत.

मागील दोन आठवड्यांपासून कांदा, बटाटा व इतर भाजीपाल्यांचे दर स्थिरावले होते. परंतु मागील आठवड्यापासून पुन्हा भाजी, कडधान्य तसेच सर्वच जीवनावश्‍यक वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. टोमॅटोचा दर ६० रुपये किलो होता, परंतु आता पुन्हा दरात वाढ झाली आहे. लसूणही महागली आहे. मध्यम आकाराची लसूण ४०० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.

राज्यात मागील दोन आठवड्यांपासून स्थानिक भाज्यांची आवक कमी झाली आहे. आता हिव्याळ्यात शेतकऱ्यांकडून नव्याने भाजीपाला लागवड करण्यात येणार असल्याने भाजीचे मळे नांगरणीला सुरवात झाली आहे. आता बाजारात काटेकणगी, भाजीची केळी व इतर फळभाज्या येऊ लागल्‍या आहेत. काटेकणगीचा दर १५० रुपये प्रतिकिलो आहे.

कडधान्यांचे दरही भडकले

भाजी, दूध, कडधान्यांचे दरसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तूरडाळ १९० रुपये तर हिरवे वाटाणे २२० रुपये किलो दराने विकले जात आहेत. तेलाचे दरही गगनाला भिडल्‍याने सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना संसाराचा गाढा चालविणे कठीण होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT