Tiger Attack: ..अचानक समोर आला वाघ! हल्ला करणार इतक्यात; चोर्ला घाटातील थरारक प्रसंग वाचा

Tiger Spotted Near Chorla Ghat: चोर्ला घाटामाथ्यावरून घरी जाताना अचानक साक्षात ढाण्या (पट्टेरी) वाघानेच दोघा दुचाकीस्वारांची वाट अडविली. तो वाघ चाल करून येणार, इतक्यात त्या दोघांनी शिताफीने दुचाकी वळवून पळ काढला.
Tiger On Road
Tiger On RoadCanva
Published on: 
Updated on: 

Tiger Spotted Near Chorla Ghat Kankumbi Village

कणकुंबी: चोर्ला घाटामाथ्यावरून घरी जाताना अचानक साक्षात ढाण्या (पट्टेरी) वाघानेच दोघा दुचाकीस्वारांची वाट अडविली. तो वाघ चाल करून येणार, इतक्यात त्या दोघांनी शिताफीने दुचाकी वळवून पळ काढला.

कणकुंबीशेजारील तळावडे-गोल्याळी मार्गावर शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास एक ढाण्या वाघ रस्त्यावरून पुढे जात असल्याचे दोघा दुचाकीस्वारांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी घाबरून दुचाकी थांबविली आणि वाघ निघून जाण्याची वाट पाहू लागले; परंतु वाघ थोडा पुढे गेला आणि परत मागे फिरला.

Tiger On Road
Mandrem Crime: राजकीय विषय नाहीच! माजी सरपंच हल्लाप्रकरण उलगडले, 'जमीन विक्री' व्यवहाराची पार्श्वभूमी

हल्ला करण्यासाठी तो दुचाकीस्वारांच्या दिशेने येऊ लागला. त्यामुळे सावध झालेल्या दुचाकीस्वारांनी तत्काळ दुचाकी वळविली आणि माघारी फिरले. तोराळी येथील आकाश पाटील आणि प्रदीप चव्हाण यांनी जीवघेण्या थरारक प्रसंगातून स्वत:ची सुटका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

GIM Student Attack
Sattari Gaur Attackc
Jerson Gomes Attack Latest News
GIM Hostel Knife Attack Latest News
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com