Droupadi Murmu Goa Visit Dainik Gomantak
गोवा

Droupadi Murmu Goa Visit: राष्ट्रपती मुर्मू यांचा गोवा दौरा; उत्तर गोव्यात पुढील तीन दिवस रस्ता खोदण्यास बंदी

राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उच्च अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Pramod Yadav

President Droupadi Murmu Goa Visit: देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून (22 ऑगस्ट) गोवा दौऱ्यावर येत आहेत. 22 ते 24 असे तीन दिवस राष्ट्रपती मुर्मू राज्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थीती लावतील.

राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उच्च अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ आता उत्तर गोव्यात या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा आदेश जारी करण्यात आला आहे.

बीएसएनएलच्या वतीने उत्तर गोव्यात 20 ते 24 ऑगस्ट या कालावधीत रस्ते खोदण्यास मनाई करण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार राष्ट्रपतींचा दौरा विचारात घेता बार्देश, तिसवाडी तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्ह्यातील महत्वाचे रस्ते आणि लेन्सवरती रस्ते खोदण्यास मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.

उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे यांनी याबाबत आदेश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्थेविरोधात 188 अंतर्गत कारवाई केली जाईल. असेही या आदेशात म्हटले आहे. 24 ऑगस्टपर्यंत आदेश लागू राहील.

दरम्यान, तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गोवा विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभाला हजेरी लावतील आणि विद्यार्थ्यांना संबोधित करतील. तसेच, राज्याच्या विधानसभेत देखील त्या उपस्थित राहून आमदारांना संबोधित करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Lok Sabha Speech: काँग्रेसच्या काळातच 'नक्षलवाद' फोफावला! अमित शाह यांचं टीकास्त्र; इंदिरा गांधींपासून मनमोहन सिंगांपर्यंत वाचला चुकांचा पाढा

Horoscope April 2026: सुवर्णसंधी! ग्रहांच्या खेळात मिथुन राशी ठरणार 'किंग'; 2 एप्रिलनंतर भाग्याची मिळणार साथ अन् श्रीमंतीचं स्वप्न होणार पूर्ण

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT