भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा गोव्यात Dainik Gomantak
गोवा

Goa Election: जे पी नड्डा निवडणुकीच्या निमित्ताने कोणता मंत्र देणार

विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून सात महिन्यांच्या आत निवडणुका होणार हे मात्र नक्की आहे. दरम्यान भाजपने या निवडणुकीसाठी आपली पूर्वतयारी सुरू केली आहे.

दैनिक गोमन्तक

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचे आज गोव्यात दाबोळी विमानतळावर दुपारी दोन वाजता आगमन झाले. त्यांचे यावेळी ढोल ताशाच्या नव्या गजरात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जंगी स्वागत करण्यात आले. तसेच त्यांच्या स्वागतासाठी यावेळी विमानतळावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, नगर विकास मंत्री मिलिंद नाईक, माजी आमदार दामोदर नाईक, माजी खासदार नरेंद्र सावईकर, नगराध्यक्ष दामोदर कासकर, नगरसेवक दामोदर नाईक, दीपक नाईक, प्रजय मयेकर, अमय चोपडेकर व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (presence of hundreds of activists was welcomed BJP national president JP Nadda in Goa)

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा गोव्यात

विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून सात महिन्यांच्या आत निवडणुका होणार हे मात्र नक्की आहे. दरम्यान भाजपने या निवडणुकीसाठी आपली पूर्वतयारी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने पक्षीय बैठकांवर बैठका पार पडल्या आहेत. गेल्या महिन्यात राष्ट्रीय संघटन मंत्री संतोष गोव्यात येऊन गेले. त्यानंतर मागील आठवड्यात 12 व 13 जुलै रोजी नड्डा यांचा दौरा होता. त्याविषयी त्यांच्या पक्षाने स्वागताची तयारीही करण्यात आली होती. परंतु दिल्लीमध्ये नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आणि उत्तर भारतातील काही राजकीय पक्षातील राजकीय घडामोडींमुळे त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर 24 व 25 जुलै रोजी निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार त्यांचे गोव्यात दाबोळी विमानतळावर आगमन झाले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत

दरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष या दौर्‍यात निवडणुकीच्या निमित्ताने कोणता मंत्र देणार याकडे पक्षाच्या सर्वच नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या दौर्‍यात नड्डा आमदार व मंत्र्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर ते कोर कमिटी, जिल्हा कार्यकारिणी आणि मंडळाचे अध्यक्ष यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार असल्याचे सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा गोव्यात

दरम्यान उद्या रविवारी सकाळी साडेआठ वाजता मंगेश येथील मंदिरात श्रींचे दर्शन घेणार आहे. त्यानंतर नऊ वाजून पंधरा मिनिटांनी ब्रह्मेशानंद स्वामी यांच्या समवेत कुंडई येथे तपोभूमीत वृक्षारोपण कार्यक्रमात भाग घेणार आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा गोव्यात

या कार्यक्रमानंतर साडेदहा वाजता पणजी येथे डॉन बॉस्को हायस्कूल मध्ये लसीकरण केंद्राला भेट देणार आहेत. शेवटी दुपारी विवांत हॉटेल पणजी येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. पत्रकार परिषदेनंतर संध्याकाळी साडेचार वाजता ते दाबोळी विमानतळावरून दिल्लीला जायला रवाना होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद; 'या' वाहनांना मिळणार सूट

Vijai Sardesai: सरदेसाईंच्या मोहिमेमुळे काँग्रेस, आप अस्वस्थ! नाव न घेता युरींचे टीकास्त्र; राजकीय वर्तुळात घमासान

Ashadhi Ekadashi: दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी! सुख दुःखाची शिकवण देणारी 'वारी'

Parra Crime: पार्किंगच्या वादातून धारदार शस्त्राने खुनी हल्ला, एकजण गंभीर जखमी; साखळीत युवकाला अटक

Rashi Bhavishya 06 July 2025: नवे काम सुरू कराल, प्रेमसंबंध मजबूत होतील; खर्च मात्र जपून करा

SCROLL FOR NEXT