साळ मध्ये प्रसिद्ध गडे उत्सवाची तयारी जोरदार Dainik Gomantak
गोवा

साळमध्ये प्रसिद्ध गडे उत्सवाची तयारी जल्लोषात

वाहनतळाचे नियोजन: 18 मार्च रोजी उत्सवास प्रारंभ

दैनिक गोमन्तक

साळ: साळ मधील प्रसिद्ध गडेत्सव 18 ते 20 मार्चपर्यंत तीन रात्री हा उत्सव साजरा होणार असून श्री महादेव भूमिका देवस्थान समिती, गडे मंडळ , साळ ग्रामपंचायत आणि साळ मधील विविध संस्था व क्लबने सर्व तयारी पूर्ण करीत असून देवस्थान अध्यक्ष कालिदास राऊत व सरपंच घनश्याम राऊत हे स्वतः लक्ष देऊन कामकाज पूर्ण करून घेत आहेत.

या बैठकीस श्री महादेव भूमिका देवस्थान समिती अध्यक्ष कालिदास राऊत , उपाध्यक्ष रवी राऊत , सचिव विशाल परब , सरपंच घनश्याम राऊत व इतर मान्यवर उपस्थित होते . शुक्रवारी या उत्सवाला सुरुवात होणार असून प्रत्येक रात्री येणाऱ्या भाविकांची वाहने साळ मध्ये दाखल होतात.

भाविकांना व नंतर गडा आणण्यासाठी धावणाऱ्या भाविकांना कोणताही अडथळा होऊ नये, म्हणून येणाऱ्या वाहनधारकांनी आपली वाहने कोणकोणत्या वाहनतळावर उभी करावी त्यावर चर्चा करण्यात आली.धुमासे मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी खास आदेश की दुचाकी वाहने " दुर्गात " येथे तसेच भूमिका मंदिरामागे राखण्याच्या होळी जवळ तसेच भूमिका मंदिराच्या उजव्या बाजूने सौंदर्यीकरणासाठी बसवलेल्या फरशीवर दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहन थांबा असेल. कासारपाल मार्गे येणाऱ्या वाहनधारकांनी नंदीश नाईक साळगांवकर यांच्या घराशेजारी व जोशी (मधला वाडा) यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेवर तसेच पांडुरंग गवस व रावजी राऊत यांच्या घराशेजारी वाहने उभी करावीत.

दोडामार्ग मार्गे येणारी सर्व वाहने यशवंत राऊत व शैलेश राऊत यांच्या घराशेजारील मोकळ्या जागेवर तसेच सर्व प्रकारची वाहने सरकारी हायस्कूलच्या मैदानावर उभी करावीत, असे कालिदास राऊत व सरपंच घनश्याम राऊत यांनी सांगितले.उत्सवानिमित्त खास पोलिस चौकी उभारली जाणार आहे. दररोज सायं.4 वा. पोलिस गावात प्रवेश करतील. वीज खंडित होऊ नये म्हणून वीज कर्मचारी रात्रीही सेवेत राहतील,असे सरपंच घनश्याम राऊत यांनी सांगितले. तिरसोळी येथे ओहोळावर तात्पुरता पूल उभारला आहे.

भाविकांसाठी महत्वपूर्ण सूचना

विशेषतः धुमासे मार्गे येणाऱ्या भाविकांनी रात्री 10 नंतर साळमध्ये प्रवेश करू नये, रात्री दहा नंतर धुमासे येथील श्री सातेरी पुरूमार मंदिराजवळ हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला जाईल व पहाटे 5 नंतरच खुला केला जाईल. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, व उत्सवाचा आनंद ,अनुभव घेत उत्सवासाठी योग्य ते सहकार्य करावे आणि आपला प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रयत्नशील रहावे, ही उत्सव आठवणीत राहावा यासाठी वाहनधारकांनी प्रत्येक रात्री कार्यक्रम संपल्यानंतर परतीचा प्रवास पहाटे 5 वाजता करावा, असे देवस्थानचे अध्यक्ष कालिदास राऊत व सचिव विशाल परब यांनी आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mopa Airport: पहिल्यांदा गोव्यातच! ‘मोपा’ विमानतळावर डिजिटल व्हिडिओवॉल; भारतातील पहिलेच डिझाईन

रॉड्रीक्स यांच्या प्रयत्नाने मुंबईत गोमंतकीयांची प्रचंड सभा भरली, 20 हजार गोवावासीय उपस्थित होते; ‘छोडो गोवा’ ठराव संमत झाला

Goa Politics: 'मतदारांचा भाजप-मगो युतीलाच पाठिंबा'! आमदार आरोलकरांचा विश्वास; धारगळमधून हरमलकर यांच्या विजयाची खात्री व्यक्त

Goa Liberation Day 2025: स्वातंत्र्यसैनिकांनी लढून मुक्त केलेला गोवा आपण कसा राखला पाहिजे, याची किमान जाणीव व्हावी....

Goa Liberation Day 2025: पोर्तुगीज येण्यापूर्वी लोक आदिलशहाच्या सैन्यात भरती होत असत, गोवा मुक्तीसाठी अविरत लढ्याची त्रिस्थळी

SCROLL FOR NEXT