मयेत भाजप पाचव्यांदा झेंडा फडकावण्यात यशस्वी

पाचव्यांदा वर्चस्व अबाधित: पण मताधिक्क्यात घट
भाजप
भाजपDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मये मतदारसंघात भाजपने खेळलेला ‘जुगार’ यशस्वी ठरला असून, वर्चस्व अबाधित ठेवले आहे. आतापर्यंत पाचव्यांदा झेंडा फडकावण्यात भाजपने यश मिळवले आहे.मात्र असे असले, तरी यानिवडणुकीत भाजपच्या मताधिक्क्यात मोठी घसरण झाली आहे.

माजी सभापती स्व. अनंत शेट यांचे कनिष्ठ बंधू प्रेमेंद्र शेट यांनी मयेचा ‘गड’ सर करण्यात यश मिळवले आहे. दुसऱ्या बाजूने भाजपने नाकारल्यामुळे मगोच्या ‘सिंह’निशाणीवर निवडणूक लढविलेले भाजपचे माजी आमदार प्रवीण झांट्ये यांच्या पदरी निराशा पडली आहे.

भाजप
गोव्यातील आठ पोलिस स्‍थानकांना नव्या जीपगाड्या

मतदारांनी त्यांना घरचा रस्ता दाखवून त्यांची चौथ्या स्थानावर पीछेहाट झाली आहे. तर नवखे असलेले ‘आरजी’चे श्रीकृष्ण परब यांनी ‘उजो’ पेटवून 3974 मते मिळवून सर्वांनाच धक्का दिला आहे.यावेळी मये मतदारसंघात भाजपने विजय मिळवला, तरी भाजपचे मताधिक्क्य मात्र प्रचंड प्रमाणात घटले आहे. 2012 च्या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला 12 हजार 54 मते मिळाली होती. 2017 साली गेल्या निवडणुकीत त्यात वाढ होऊन भाजपच्या बाजूने 12,430 मते पडली होती. यावेळी मात्र भाजपला केवळ 7874 एवढी मते मिळाली. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपला साडेचार हजार मते कमी मिळाली आहेत.

भाजपच्या मतांची विभागणी झाल्याने मताधिक्क्य घटल्याचा दावा कार्यकर्ते करत आहेत.काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीचे संतोषकुमार सावंत हे दुसऱ्या स्थानी आले असले, तरी त्यांच्याही मताधिक्क्यात 2,718 मतांची घट झाली.सावंत यांनी काँग्रेसच्या चिन्हावर गेली निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना 7456 मते मिळाली होती. यावेळी मात्र त्यांना 4738 मतांवर समाधान मानावे लागले आहे.

भाजप
काणकोण येथील मल्लिकार्जुन देवस्थानच्या अध्यक्षपदी विठोबा देसाई यांची निवड

पाचव्यांदा फुलले ‘कमळ’

मये मतदारसंघाची रचना झाल्यापासून 1989 पासून आतापर्यंत झालेल्या आठ विधानसभा निवडणुकांत सलग चारवेळा मिळून आतापर्यंत या मतदारसंघात भाजपचे ‘कमळ’ फुलले आहे. सुरवातीच्या दोन निवडणुकांत या मतदारसंघात मगोने वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यानंतर 2002 साली काँग्रेसचा अपवाद वगळता या मतदारसंघावर भाजपचेच वर्चस्व राहिले आहे. 1999 साली भाजपचे स्व.प्रकाश फडते निवडून आल्यानंतर 2007 आणि 2012 च्या निवडणुकीत स्व. अनंत शेट यांनी विजयी किमया केली. तर 2017 च्या निवडणुकीत प्रवीण झांट्ये निवडून आले होते. यावेळी भाजपचा ‘फॉर्म्युला’ यशस्वी ठरून प्रेमेंद्र शेट यांनी मयेचा ‘गड’ सर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com