Pre-monsoon work In Bicholim  Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : ग्रामीण भागात घरांची शाकारणी सुरू; प्लास्टिकलाही मागणी

डिचोली परिसरात मान्‍सूनपूर्व कामांची लगबग

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली तालुक्‍याच्‍या ग्रामीण भागात मान्‍सूनपूर्व कामांची लगबग सुरू झाली असून, सध्या अनेक ठिकाणी घरांची शाकारणी आदी कामे चालू असल्याचे दिसून येत आहे. वाढती मजुरी, त्यात मजूर लोक वेळेवर मिळणे दुरापास्त झाल्याने ही कामे करताना अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पावसाळ्यात गळतीपासून घरे सुरक्षित राहावीत यासाठी पावसाळ्यापूर्वी घरे शाकारणीची कामे आटोपून घेतात. मोसमी पावसाला अजून एक महिन्याचा कालावधी असला तरी काही भागात आतापासूनच घरे शाकारणीची कामे सुरू झालेली आहेत.

घरांसह काही ग्रामीण भागात गुरांचे गोठेही शाकारणीची कामे सुरू आहेत. पावसाळा सुरू होईपर्यत आणखी किमान महिनाभर तरी या कामांची लगबग दिसून येणार आहे. पावसाच्या झडीपासून संरक्षण मिळावे यासाठी बहुतांश घरांसह इमारतींना प्लास्टिकची आच्छादने घालण्यात येतात. त्यामुळे आता प्लास्टिकलाही मागणी येणार आहे.

मजुरांचा भाव भलताच वाढला!

एक काळ असा होता, गावोगावी एकमेकांच्या सहभागातून घरे आणि गोठे शाकारणीची कामे करण्यात येत असत. मात्र वेळेचा अभाव म्हणा किंवा अनास्था म्हणा कालांतराने मजुरांची गरज भासू लागली.

दहा-बारा वर्षांपासून तर बहुतांश भागात मजुरांच्या मदतीनेच घरे आणि गोठे शाकारणीची कामे करण्यात येतात. एका बाजूने वेळेवर मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे तर दुसऱ्या बाजूने मजुरीही वाढत आहे. मजूर हजार ते दीड हजार रु. मजुरी आकारतात.

तर, काही गट ठराविक रक्कम ठरवून ही कामे करतात. पावसाळ्यापूर्वी ही कामे आटोपणे आवश्यक असल्याने अनेकजण मजूर सांगतात ती रक्कम मोजायला तयार असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT