Pratima Coutinho Slams Goa Government  Dainik Gomantak
गोवा

Pratima Coutinho : भाजप सरकारच्या गोव्यातील आंधळ्या कारभारावर उजेड टाकण्यासाठीच दिल्लीत धरणे

ओल्ड गोवा येथील बेकायदेशीर बंगला पाडेपर्यंत आंदोलन चालूच

दैनिक गोमन्तक

Pratima Coutinho Slams Goa Government : ओल्ड गोवा येथे युनेस्को हेरिटेज क्षेत्रात जो बेकायदेशीर बंगला उभारण्यात आला आहे तो दिल्ली येथील उच्च पदस्थ भाजप महिला नेत्याचा असून त्यासाठीच गोव्यातील भाजप सरकार या बेकायदेशीर बांधकामांकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप आपच्या नेत्या प्रतिमा कुतीन्हो यांनी केला.

गोव्यातील भाजप सरकारचा हा आंधळा कारभार चव्हाट्यावर मांडण्यासाठीच आम्हीं दिल्लीत धरणे धरले अशी माहिती त्यांनी दिली.

या बंगल्याच्या विरोधात गोव्यातील आंदोलकांनी हल्लीच दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर धरणे धरले होते. त्याची माहिती देण्यासाठी आज मडगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत या बंगल्याच्या विरोधात राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि केंद्रिय सांस्कृतिक मंत्री यांच्या कार्यालयात निवेदने दिल्याची माहिती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेला कुतीन्हो यांच्या व्यतिरिक्त शंकर पोळजी, ग्लेन काब्राल, अँथनी डिसिल्वा व इफ्तीयाझ सय्यद हे उपस्थित होते.

हे बांधकाम पुरातत्व संरक्षीत क्षेत्रांत येत असूनही या बेकायदेशीर बांधकामाविरोधात हे खाते करवाई का करत नाही असा सवाल करून आपल्याच संरक्षीत जागा हे खाते राखून ठेऊ शकत नाही तर अशा खात्याची काय गरज असा सवाल शंकर पोळजी यांनी यावेळी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT