Balrath Employee Strike: बालरथ कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला मागे; मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आश्वासन

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे.
BalRath Employee Strike
BalRath Employee StrikeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

बालरथ कर्मचाऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आला आहे. गेल्या विधानसभा अधिवेशानात या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याचे सांगण्‍यात आले, परंतु तसे कोणतेही परिपत्रक अजून आलेले नाही. याबाबत कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.

BalRath Employee Strike
Mapusa Goa Can : म्हापशात ‘गोवा कॅन’ कडून ग्राहकांमध्ये जागृती मोहीम

आमच्या मागण्यांसाठी आम्ही विधानसभा अधिवेशनापासून म्हणजेच 27 मार्चपासून येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार असून मागण्या मान्य झाल्याशिवाय आता मागे हटणार नाही, असा इशारा बालरथ कर्मचारी संघटनेच्या प्रमुख स्वाती केरकर यांनी दिला होता. मात्र माहितीनुसार, आता हा आंदोलन करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी मागे घेतला आहे.

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे. याबाबतचे पत्रही देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे तूर्तास आंदोलन करण्याचा निर्णय बालरथ कर्मचाऱ्यांनी मागे घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Kadamba Transport Workers Strike
FDA Raids: तूप-जिऱ्याच्या पावडरला 'एफडीए'चा दणका; 5 निकृष्ट उत्पादनांवर तात्काळ विक्रीबंदी, बाजारातील साठा मागे घेण्याचे आदेश
Karapur One Goa Project Protest
House Of Abhinandan Mega project Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com