Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: प्रतिमा कुतिन्हो यांची काँग्रेसमध्ये घरवापसी; नेत्यांकडून स्वागत, पक्ष सदस्यत्वाचा अर्ज गटसमिती अध्यक्षांकडे सादर

Pratima Coutinho Joins Congress: मागील विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेस पक्ष सोडलेल्या महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी गुरुवारी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: मागील विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेस पक्ष सोडलेल्या महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी गुरुवारी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे पक्ष कार्यालयात स्वागत केले.

याप्रसंगी गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रभारी सचिव अंजली निंबाळकर, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, कार्यकारी अध्यक्ष आमदार एल्टन डिकॉस्ता, एम. के. शेख, आमदार कार्लोस फेरेरा, महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिक्षा खलप, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सावियो कुतिन्हो, नावेली गटाध्यक्ष पीटर कुतिन्हो, बिना नाईक, चारही जिल्हाध्यक्ष तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

ठाकरे यांनी प्रतिमा कुतिन्हो यांचे पक्षात स्वागत केले. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे काम पक्षाकडून केले जात आहे, असे त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, प्रतिमा कुतिन्हो यांनी अनेक आंदोलने केली आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला बळकटी मिळेल. त्यांच्यात लढण्याची ताकद असून, अनेक प्रश्नांवर त्या यापूर्वी रस्त्यावर उतरल्या आहेत. हे संपूर्ण राज्याने पाहिले आहे. आता त्यांच्याकडून महत्त्वाचे प्रश्न घेऊन पुन्हा रस्त्यावर उतरण्याची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT