Prashant Kishor dainik gomantak
गोवा

गोवा: TMC साठी नवीन पहाट आणण्यात प्रशांत किशोर अपयशी

गोवा: भारतातील प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार आणि सल्लागार किशोर गोव्यात फेल

दैनिक गोमन्तक

पणजी: भारतातील प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार आणि सल्लागार म्हणून प्रशांत किशोर यांच्याकडे पाहिले जाते. तर प्रशांत किशोर हे ज्या पक्षाच्या प्रचाराची रणनीती ठरवतील तो पक्ष जिंकणारच असे समिकरणच झाले होते. मात्र गोव्यात प्रशांत किशोर हे अपयशी झाले असून गोव्यात TMC साठी नवीन पहाट आणण्यात त्यांना यश आले नाही. उलट गोव्याच्या राजकारणात तग धरू पाहत असलेल्या तृणमूलला (Trinamool Congress) एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यातच आता तृणमूलच्या एका उमेदवाराने पक्षाला राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता देशाच्या राजकीय वर्तुळात प्रशांत किशोर यांचा मिडास स्पर्श राहिला नसल्याचे म्हटले जात आहे. (Prashant Kishor fails to bring in new dawn for TMC in goa)

भारतातील प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार आणि त्यांची सल्लागार संस्था, इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी (I-PAC) यांना अनेक राज्यांमध्ये मोठे यश मिळाले आहे. तर देशातील निवडणुका कशा जिंकायच्या आणि लोकांवर प्रभाव कसा पाडायचा हे प्रशांत किशोर यांना माहीत आहे. पण गोव्याच्या बाबतीत ते अपयशी ठरले आहेत.

तृणमूल काँग्रेस (trinamool congress) ही राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा असणारी पार्टी असून ती गोव्याच्या राजकारणात (politics) आता कुठे तग धरू पाहत होती. त्यातच ही त्यांची येथे पहिलीच निवडणूक असल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री (CM) आणि पक्षाध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी याची जबाबदारी रणनीतीकार प्रशांत किशोर यांना दिली होती. पण मतमोजणीनंतर फक्त ५% मतदारच टीएमसीकडे (TMC) प्रभावित झाल्याचे दिसत आहे.

दरम्यान, आम्ही हा जनादेश नम्रतेने स्वीकारतो, प्रत्येक गोयंकरांचा विश्वास आणि प्रेम मिळवण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करण्यास वचनबद्ध आहोत. कितीही वेळ लागला तरी आम्ही इथेच असू आणि गोव्याच्या लोकांची सेवा करत राहू, असे टीएमसीकडून (TMC) आपल्या भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत.

गोव्यात टीमसीची झालेली पिच्छे हाट यावरून राजकीय विश्लेशक आता बोलताना दिसत आहेत. ते म्हणत आहेत की, I-PAC ला वाटले की ते फक्त TMC साठी एक आधार बनवू शकतात. तर टीएमसीत व्यक्ती आणि सेलिब्रिटींचा (celebrities) समावेश करून घेतला तर आपल्याला मते मिळतील. पण ज्यांना घेण्यात आले आहे, त्यापैकी बहुतेक ओळखले जातात असे नाही.

तसेच टीएमसीच्या एका माजी सदस्याने सांगितले की, पक्षाची खराब कामगिरी I-PAC च्या "स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट" (Strategic management) यासह विविध कारणांमुळे आहे. तर गोव्यात पक्षाला अपयश येण्याला जर कोणी जबाबदार असेल तर ते प्रशांत किशोर (Prashant Kishor), डेरेक ओ'ब्रायन (Derek O’Brien), महुआ मोइत्रा (Mahua Moitra) आणि लुइझिन्हो फालेरो (Luizinho Faleiro) हे आहेत. कारण निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरही त्यांनी कोणत्याही स्थानिक नेतृत्वाशिवाय पक्षाला रामभरोसे सोडले.

यावर मौन सोडताना किशोर यांनी, मी गोव्यात सहभागी नाही. ही पूर्णपणे खोटी माहिती आहे. I-PAC TMC सोबत काम करत आहे, ज्या संस्थेशी मी संबंधित होतो, असे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT