मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लिंक रोडला विरोध करणाऱ्या गावकऱ्यांनी उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय यांना वरखंड-नागझर पंचायतीने दिलेला स्टॉप वर्क ऑर्डर सादर केली. नागरी उड्डयन संचालनालयाने, त्यांच्याकडे रस्ता बांधण्यासाठी सर्व परवानग्या आहेत असे यावेळी म्हणातले आहे. दरम्यान, मोपा (Mopa) विमानतळ (airport) जोडरस्त्यासंदर्भातील याचिकेवर उच्च न्यायालयात येत्या 25 मार्च रोजी अंतिम निवाडा होणार आहे. याबाबत बोलताना अॅड. निखिल पै म्हणाले की, गोव्यात (goa) जमिनीचा भाग कमी असल्यामुळे याबाबत योग्य तो निर्णय घेऊनच हा प्रकल्प हाती घेतला आहे, तसेच याबाबत आणखी विचार विनिमय सुरू आहे.
दरम्यान अशातच आता मोपा विमानतळ परिसरात पोलीस (police) स्थानकाची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी पोलीस निरीक्षक महेश केरकर यांच्यासह एक पीएसआय, दोन एएसआयस व अन्य 19 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र अद्याप याठिकाणी इमारत नसल्यामुळे संबंधित कामकाजासाठी कोणता पर्याय काढला जातो हे पाहणे महत्वाचे राहणार आहे.
दरम्यान, गोव्याचे मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ ऑगस्ट 2022 मध्ये कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. GMR पायाभूत सुविधांनी चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी 58 कोटी रुपयांचा नफा घोषित करून सांगितले. विमानतळ व्यवसायाला त्याच्या ऊर्जा, रोड आणि इतर पायाभूत सुविधा व्यवसायांमधून विभाजित केल्यानंतर विमानतळ समूहाने जाहीर केलेली ही पहिली आर्थिक कमाई होती.
GMR ज्याने फ्रेंच कंपनी 'Groupe ADP' कडून गुंतवणूक प्राप्त केली असून ही कंपनी दिल्ली आणि हैदराबाद विमानतळांची ऑपरेटर आहे आणि गोव्यातील मोपा (Mopa Airport) आणि आंध्र प्रदेशातील भोगापुरम विकसित करण्यासाठी बोलीदेखील जिंकली आहे. कंपनीने इंडोनेशियातील मेडान विमानतळ चालवण्याचे अधिकार मिळाले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.