वास्को : वरुणापुरी जंक्शन राष्ट्रीय महामार्गावर परप्रांतीय मजुरांची वाढती गर्दी धोकादायक ठरत आहे. कसलेही भान न ठेवता परप्रांतीय मजूर लोक सकाळच्यावेळी भर रस्त्यात गर्दी करून उभे राहत आहेत. त्यामुळे वाहन चालका बरोबरच इतर पादचारी लोकांनाही हे धोक्याचे ठरले आहे. तर हे परप्रांतीय मजूर डोकेदुखी ठरतं असून त्यांना या ठिकाणाहून हटवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (Growing crowd of Migrant worker on Varunapuri Junction National Highway)
वरुणापूरी चौकात वरुणापूरी वसाहत, केंद्रीय विद्यालयाकडे वाहनांची महामार्ग वरून ये-जा चालू असते. महामार्गावरून (Highway) मांगुरहिलकडे येणारी व महामार्गावर जाणारी वाहने (Vehicle) मोठ्या प्रमाणात असतात. त्यातच वरुणापुरी सडा महामार्ग सुरू झाल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करू लागली आहे. त्यामुळे वरुणापुरी चौकात हा अपघात प्रणव क्षेत्र झाल्याने या ठिकाणी वाहन चालका बरोबर पादचाऱ्यांनाही जोखीम पत्करावी लागते.
दरम्यान सकाळच्या वेळी ८ ते ९:३० वाजण्याच्या सुमारास या चौकात परप्रांतीय मजुरांची (Migrant worker) मोठी गर्दी असते. हे मजूर लोक मोलमजुरीसाठी जाण्यासाठी या ठिकाणी जमा होतात. मग त्यांना बांधकाम कंत्राटदार, अभियंते, येऊन आपल्या गाडीत बसून घेऊन जातात. दरम्यानच्या काळात हे सर्व मजूर राष्ट्रीय महामार्गावर (Highway) या चौकात गर्दी करून राहत असल्याने याचा वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. वाहनचालकांना वाहन (Vehicle) चालवताना जोखीम पत्करून वाहन चालवावे लागते. तसेच इतर पादचाऱ्यांना भर रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे यापूर्वी लहान-मोठे अपघात (Accident) या ठिकाणी या मजुरांमुळे घडलेले आहेत. तसेच हे मजूर लोक (Migrant worker) येथील महामार्गावर मध्यभागी असलेल्या दुभाजकावर पान चघळत बसलेले असतात. त्यामुळे वाहनचालकांना गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागते.
दरम्यान वरुणापुरी चौकात (Varunapuri Chowk) आता वाहतूक रहदारीचा ताण वाढल्याने मोठा अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आता वरुणापुरी ते सडा हा महामार्ग (Highway) चालू झाल्याने या ठिकाणी अवजड वाहनांना बरोबर इतर चारचाकी, दुचाकी वाहतूक रहदारी वाढली आहे. तसेच हे मजूर लोक (Labor people) अर्धाअधिक रस्ता अडवून रस्त्यावर उभे राहत असल्याने आता वाहन चालकांना धोका अधिकच वाढला आहे. या मजुरांना या ठिकाणी उभे राहणे बंद करण्यात यावे अशी मागणी वाहनचालका बरोबर इतर लोकांकडून होत आहे. तसेच या ठिकाणी सकाळच्या प्रहरी वाहतूक रहदारीवर नियंत्रण ठेवण्यास पोलिस (Police) तैनात ठेवण्यात यावे, अशीही मागणी होत आहे. तसेच या मजुरांना न्यायला येणाऱ्या गाड्या ही भर रस्त्यात उभ्या करत असल्यानेही वाहनचालकांना जोखमीचे होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.