CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: कर्नाटकात प्रमोद सावंत यांचा हटके प्रचार चर्चेत

गोव्यातील भाजप नेते देखील कर्नाटकात पक्षासाठी प्रचार करत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant कर्नाटकची विधानसभा निवडणूक जवळ आली असून, त्यासाठी भाजप जोरदार प्रचार करत आहे. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी कर्नाटकमध्ये प्रचार सभा घेतल्या आहेत.

कर्नाटकचा शेजारी असलेल्या गोव्यातील भाजप नेते देखील पक्षासाठी प्रचार करत आहेत. काही दिवसांपूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे खानापूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रचारामध्ये व्यस्त असलेले पाहायला मिळाले.

कर्नाटक दौऱ्यावर असलेले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील कर्नाटकातील जनतेशी एका वेगळ्या शैलीत संवाद साधताना दिसत आहेत.

सावंत यांच्या प्रचाराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात ते बाजारपेठेतील एका भाजी विक्रेतीकडून भाजी खरेदी करताना दिसत आहेत.

तर दुसऱ्या एका फोटोत सावंत रिक्षेमधून प्रवास करतेवेळी स्थानिकांशी संवाद साधत असल्याचे दिसत आहे. सध्या निवडणुकीचा प्रचार करतेवेळी मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT