Pramod Sawant Swearing-in Ceremony Dainik Gomantak
गोवा

प्रमोद सावंत मंत्रिमंडळात ख्रिस्ती समाजाला झुकतं माप?

मिशन सालसेत बंद, मात्र ख्रिश्चन मतदारांना दुसऱ्या बाजूने खुश ठेवण्याचा प्रयत्न

दैनिक गोमन्तक

मडगाव : सोशल इंजिनिअरिंग करण्यात माहीर असलेल्या भाजपने गोव्यात मंत्रिमंडळ स्थापन करताना प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व देऊन खुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. असं असलं तरीही ख्रिस्ती समाजाला तब्बल 35 टक्के प्रतिनिधीत्व देऊन त्यांच्या पदरात जरा जास्तीचेच माप टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या मंत्रिमंडळात तिसऱ्या क्रमांकावर मॉविन गुदिन्हो हे असून निलेश काब्राल आणि बाबुश मोन्सरात यांनाही या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय यापुढे होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात या सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना मंत्रिपद दिल्यास या मंत्रिमंडळात ख्रिस्ती मंत्र्यांचा आकडा चारवर पोहोचणार आहे.
भाजप (BJP) सरकारमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधीत्व मिळत आहे. प्रमोद सावंत यांच्या मागच्या सरकारातही पाच ख्रिस्ती मंत्री होते. मात्र त्यापैकी दोन काँग्रेसमधून फुटून भाजपात सामील झालेल्या 10 आमदारापैकी होते.

सध्या ख्रिस्ती समाज गोव्यात काँग्रेसपासून (Congress) दूर जात असताना भाजप सरकारमध्ये सध्या तीन आणि भविष्यात आणखी एक असे चार ख्रिश्चन मंत्री ठेवण्यामागे या समाजाची मते भाजपकडे वळविण्याची खेळी म्हणून पाहिले जात असून येत्या लोकसभा निवडणुकीत या समाजाचा पाठिंबा भाजप उमेदवाराला मिळण्याबरोबरच भाजप हा ख्रिश्चन विरोधी पक्ष नाही हा संदेशही देण्याचा हा एक प्रयत्न म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT