गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंतांसह 8 मंत्र्यांचा शपथविधी

विश्वजीत राणेंचं नाव दुसऱ्या स्थानी, ढवळीकरांसह अपक्षांचं नाव नाहीच
Goa Assembly Swearing Ceremony Updates
Goa Assembly Swearing Ceremony UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोव्यात डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. प्रमोद सावंतांसह 8 मंत्र्यांचाही शपथविधी पार पडणार आहे. वाळपईचे आमदार विश्वजीत राणेंचं नाव या मंत्र्यांच्या यादीत सर्वात आघाडीवर असून मगोपच्या सुदिन ढवळीकरांसह अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड, आणि डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचं नाव यादीतून गायब आहे.

Goa Assembly Swearing Ceremony Updates
काळे कपडे किंवा मास्क घालणाऱ्यांना शपथविधी सोहळ्यात प्रवेश नाही: तानावडे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांच्याकडे शपथ घेणाऱ्या आमदारांची यादी सादर केली आहे. या यादीत वाळपईचे आमदार विश्वजीत राणे, मॉविन गुदिन्हो, फोंड्याचे आमदार रवी नाईक, नीलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे आणि अतानासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात यांच्या नावाचा समावेश आहे. विश्वजीत राणेंना दुसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं पद मिळण्याची शक्यता आहे.

Goa Assembly Swearing Ceremony Updates
नवं सरकार नवा कार्यकाळ! गोवा सरकारचा नोकऱ्यांवरती भर

महत्त्वाची बाब म्हणजे मगोपच्या (MGP) सुदिन ढवळीकर यांचं आणि अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स तसंच डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचं नाव मात्र या यादीत नसल्याने पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत. या तिघांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळणार अशी चर्चा सुरु होती. सुदिन ढवळीकरांच्या नावाला अजूनही भाजपच्या (BJP) नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा विरोध कायम आहे. त्यामुळे कॅबिनेटच्या उरलेल्या जागांमध्ये या नावांना संधी मिळणार की भाजप आणखी वेगळी खेळी खेळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Konkani Essay Book Launch
Damone Family Fire Case Belagavi
Santinez Footpath Damage Panaji
Rape Case Promise of Marriage Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com