पणजी : गोव्यात भाजपने विधानसभा निवडणूक जिंकत सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. तर काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान काळजीवाहू मुख्यमंत्री सावंत यांचे दिल्ली दौरे सुरू असून त्यांनी शनिवारी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट दिल्ली येथील निवसस्थानी घेतली. यावेळी ठाकूर यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे अभिनंदन केले असून सावंत यांना शुभेच्छा दिल्या. (Praise of Chief Minister Pramod Sawant from Union Minister Thakur)
गोवा विधानसभा निवडणुकीत भाजप (BJP) विरूद्ध काँग्रेस अशी लढत रंगली होती. मात्र भाजपने 20 जागा जिंकत हरायचं नाय म्हणत ही बाजी एक हाती मारली. तर राज्यात सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. तसेच गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दुसऱ्यांदा सावंत यांच्याकडे देणार असल्याचे खुद्द पंतप्रधान (PM) नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरद्वारे माहिती दिली होती. त्यामुळे केंद्रात काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे वजन वाढल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान शनिवारी काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे दिल्ली दौऱ्यावर गेले असता त्यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. ही भेट त्यांनी ठाकूर यांच्या दिल्ली (Delhi) येथील निवसस्थानी घेतली. त्यादरम्यान ठाकूर यांनी सावंत यांचे स्वागत केले. तसेच त्यांच्याकडे गोव्याची मुख्यमंत्री पदाची दुसऱ्यांदा जबाबदारी येत असल्याने त्यांचे अभिनंदन केले. तर पुढील वाटचालीसाली शुभेच्छा दिल्या. तसेच काळजीवाहु मुख्यमंत्री (CM) प्रमोद सावंत 23 मार्च रोजी गोव्याचे (Goa) मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच शक्यता आहे. तर शपथविधीचा कार्यक्रम ही भव्य असणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.