Porvorim Flyover Work  Dainik Gomantak
गोवा

Porvorim: पर्वरीत कोंडतोय श्‍वास! धुळीचे साम्राज्य, नागरिक त्रस्त; उड्डाण पुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी, पर्यायी मार्गांचाही फज्जा

Porvorim Flyover Work: पर्वरी येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे सध्या वाहनचालक आणि स्थानिक नागरिक अक्षरशः त्रासून गेले आहे. ते सरकारच्या नियोजनावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पर्वरी येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे सध्या वाहनचालक आणि स्थानिक नागरिक अक्षरशः त्रासून गेले आहे. ते सरकारच्या नियोजनावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहे.

सरकारचा ‘किमान त्रास’ देण्याचा उद्देश कागदावरच असल्याचे दिसत असून, प्रत्यक्षात मात्र गिरी ते ओ-कोकेरो जंक्शनपर्यंत वाहतुकीचा मोठा गोंधळ उडालेला पाहायला मिळत आहे. सध्या सारस्वत बँक ते ओ-कोकेरो जंक्शनपर्यंतचा रस्ता एका बाजूने बंद असल्याने सर्व भार अंतर्गत रस्त्यांवर पडत आहे.

गिरी आणि सांगोल्डा मार्गे येणारी वाहने जेव्हा सारस्वत बँक जंक्शनवर एकत्र येतात, तेव्हा तिथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. ही कोंडी कधीकधी १ किलोमीटरपर्यंत मागे जाते, ज्यामुळे वाहनचालकांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाया जात आहे.

वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांना केवळ विलंबाचाच नाही, तर धुळीचाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दमियान दी गोवा ते सारस्वत बँक या पट्ट्यात उडणारी धूळ दुचाकीस्वारांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. यामुळे श्वसनाचे त्रास होत असून, कंत्राटदार कंपनीकडून पाणी फवारणीसारख्या उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे.

वाहनचालकांच्या काही मागण्या...

१.गिरी येथेच वाहतूक वळवा : गिरी येथील मुख्य जंक्शनवरच वाहने ‘आराडी’ भागाकडे वळवल्यास, ती वाहने अंतर्गत रस्त्यांतून थेट कदंब डेपोमार्गे बाहेर पडू शकतात. यामुळे सारस्वत बँक जंक्शनवरील ताण कमी होईल.

२.पर्यायी मार्गांचे नियोजन : ज्या गाड्या ओ-कोकेरो जंक्शनकडे जातात किंवा शिक्षण संचालनालयाकडे निघतात, त्यांच्यासाठी स्पष्ट दिशादर्शक फलक लावणे आवश्यक आहे.

३.पोलीस बळाचा वापर : केवळ सिग्नलवर अवलंबून न राहता इतर महत्त्वाच्या वळणांवर ‘वाहतूक पोलीस’ किंवा ‘होमगार्ड्स’ ची नेमणूक करावी, जेणेकरून मॅन्युअली वाहतूक सुरळीत करता येईल.

४.धूळ नियंत्रणासाठी उपाय : उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या कंपनीने दिवसातून किमान ३ ते ४ वेळा संबंधित मार्गावर पाणी फवारणी करावे.

५.जड वाहनांचे नियंत्रण : पीक अवर्समध्ये (सकाळी आणि संध्याकाळी) अवजड वाहनांची वर्दळ अंतर्गत रस्त्यांवरून पूर्णपणे बंद करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Brazil Helicopter Crash: ब्राझीलमध्ये दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच भीषण टक्कर; 6 जणांचा मृत्यू, कार डीलरशिपच्या पार्किंगमध्ये कोसळल्याने 20 वाहने खाक VIDEO

Labh Drishti Rajyog: मंगळ आणि गुरुच्या संयोगाने बनतोय 'लाभ दृष्टी राजयोग'; 28 जूनपासून 3 राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

US Iran Peace Deal: अमेरिका-इराण शांतता कराराला इस्रायलचा सुरुंग; नेतन्याहूंचा ट्रम्प यांना फोन, लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्यास साफ नकार

Goa Politics: शिरोड्यात राजकीय वातावरण तापले, अनेक संभाव्य समीकरणांचे संकेत; काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप अनिश्चितता

FIFA World Cup 2026: फिफा विश्वचषकात जर्मनीचा नवा इतिहास; कुरासाओचा 7-1 ने धुव्वा उडवत ब्राझीलचा 'तो' मोठा रेकॉर्ड मोडला

SCROLL FOR NEXT