"तो जर भेटायला पर्वरी ओलांडून आला, तर त्याच्याशी लग्नच कर"! 2100 साली कसा दिसणार पर्वरीचा रोड? पहा धमाल Photo

AI generated Porvorim flyover image: पर्वरी येथील उड्डाणपुलाचे काम सध्या सुरू असून, त्यामुळे निर्माण होणारी धूळ आणि वारंवार होणारे ट्रॅफिक जाम यामुळे गोव्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
Porvorim flyover viral photo, Goa flyover AI image
Porvorim flyover viral photo, Goa flyover AI imageDainik Gomantak
Published on
Updated on

पर्वरी येथील उड्डाणपुलाचे काम सध्या सुरू असून, त्यामुळे निर्माण होणारी धूळ आणि वारंवार होणारे ट्रॅफिक जाम यामुळे गोव्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. दैनंदिन प्रवास करताना वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर या विषयावरून मिश्किल चर्चा रंगू लागल्या आहेत.

दरम्यान, Reddit या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पर्वरी उड्डाणपुलाबाबतचा एक AI द्वारे तयार केलेला फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये पर्वरी परिसर भविष्यातील शहरासारखा दाखवण्यात आला असून, प्रचंड उंच इमारती, उडत्या तबकड्या आणि अत्याधुनिक दृश्ये दिसत आहेत.

मात्र, या सगळ्या झगमगाटातही उड्डाणपुलाचे काम अर्धवटच असल्याचे दाखवण्यात आले आहे. याच विरोधाभासामुळे हा फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हायरल फोटोखाली अनेक मजेशीर आणि उपरोधिक प्रतिक्रिया उमटत आहेत.

एका युजरने लिहिले आहे की, “जर कोणी तुम्हाला पर्वरीतून प्रवास करून भेटायला येत असेल, तर त्याच्यासोबत थेट लग्नच करा,” असा गंमतीशीर सल्ला देण्यात आला आहे. तर दुसऱ्या एका युजरने, “हसून हसून हृदय हातात आलं आहे,” अशी प्रतिक्रिया देत या फोटोवर खिल्ली उडवली आहे.

Porvorim flyover viral photo, Goa flyover AI image
Viral Post: 'गोव्यात भारी वाटलं, परत निघताना मात्र त्रास का'? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल; बस, टॅक्सीवरती नेटकऱ्यांच्या कमेंट्स

काही युजर्सनी मात्र या विनोदामागील वास्तवाकडे लक्ष वेधले असून, उड्डाणपुलाचे काम कधी पूर्ण होणार, असा सवाल उपस्थित केला आहे. नागरिकांच्या मते, सोशल मीडियावरील हे विनोदी मीम्स आणि AI जनरेटेड फोटो लक्ष वेधण्यासाठी एक प्रकारचा डिजिटल निषेध ठरत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com