Porvorim: धुळीचे साम्राज्य, मापन मात्र एकाच ठिकाणी; पर्वरीतील उड्डाणपुलाच्या कामामुळे प्रदूषणाची वाढली पातळी

Porvorim dust pollution: पर्वरी येथे उड्डाणपुलाच्या कामामुळे सध्या धुळीचे साम्राज्य पसरले आहे.
Porvorim dust pollution
Porvorim dust pollutionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : पर्वरी येथे उड्डाणपुलाच्या कामामुळे सध्या धुळीचे साम्राज्य पसरले आहे. असे असले तरी या धूळ प्रदूषणाचे मापन केवळ एकाच ठिकाणी होत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.

या पुलाच्या कामासाठी खोदाई सुरु असताना फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान धूळ प्रदूषणाचे मापन केले जात होते. पुढे पाऊस सुरु झाला आणि मापन होणे बंद झाले. आता तक्रारी वाढल्यानंतर मापन करावे लागेल असे सरकारी यंत्रणेला वाटते.

सध्या इन्सिस्ट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या केंद्र सरकारच्या शैक्षणिक संस्थेजवळ धूळ मापन यंत्रणा बसवण्यात आली आहे. तेथेही धूळ प्रदूषणाने पातळी ओलांडल्याची माहिती मिळाली आहे.

राजधानी पणजी आणि शेजारील पर्वरी येथे हवेतील प्रदूषण एवढ्या पातळीवर पोहोचले आहे की नागरिक रोजच्या रोज हताशपणे श्वास घेण्याची वेळ येऊ लागली आहे. छातीत कोंडलेपणा, श्वास लागणे, डोळ्यांत जळजळ आणि तीव्र थकवा अशी लक्षणे आता सामान्य झाली आहेत.

Porvorim dust pollution
Goa Accident: दारूच्या नशेत 'रिव्हर्स'; पादचारी ठार, बेभान कार चालवणाऱ्या युवकास पणजी पोलिसांकडून अटक

खोकला, दमा आणि श्वास...

वाढत्या प्रदूषणामुळे खोकला, दमा, श्वास घेण्यास त्रास, छातीत धसधस, डोकेदुखी यांसारख्या तक्रारींमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे डॉक्टर सांगत आहेत. हिवाळा, बांधकामामुळे निर्माण होणारी धूळ, वाहतुकीचा वाढता ताण आणि सणासुदीच्या गर्दीमुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. पर्यावरणप्रेमींच्या मते, या स्थितीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर पुढील काही वर्षांत राजधानी क्षेत्रातील श्वसनविकार वाढून गंभीर आरोग्यसंकट उभे राहू शकते.

Porvorim dust pollution
Goa Politics: भाजप शिस्तीला आव्हान! संजना वेळीप काँग्रेसमध्ये; आजगावकर उमेदवार उभे करण्याच्या तयारीत

धुळीमुळे घरातून बाहेर पडणेही कठीण झाले आहे. रोजचा त्रास डोळ्यासमोर आहे, पण उपाय मात्र दिसत नाहीत. सरकारने धूळ प्रदूषण आटोक्यात आणून उड्डाण पुलाचे काम करणे इष्ट.

- सूरज शेणॉय, पर्वरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com