Porvorim Police With Accused Dainik Gomantak
गोवा

Porvorim Crime News : बनावट कागदपत्रे सादर करीत बँकेला लावला चुना; पती, पत्नीला अटक

पर्वरी पोलिसांची कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

मृत व्यक्तीचे ओळखपत्र वापरून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली. या गुन्ह्यात संशयितासोबत एका महिलेचाही समावेश असल्याचे समोर येत आहे. संशयिताने पर्वरीतील अजून एका बँकेची फसवणूक केल्याचीही तक्रार नोंद आहे.

पर्वरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने व त्याच्या पत्नीने सुकुर येथील एका बॅकेत बनावट कागदपत्रांसह वाहन कर्जासाठी अर्ज सादर केला. संशयितांनी बनावट कागदपत्रे सादर करीत कर्ज मंंजूर करुन घेतले.

8 लाख रुपयांची कार खरेदी करण्यासाठी बँकेला हायपोथेकेशन दर्शविणारी बनावट विमा प्रत तयार केली आणि संशयिताची पत्नी कर्जाला जामीनदार म्हणून उभी राहिली.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बॅकेच्या व्यवस्थापकांनी पर्वरी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पर्वरी पोलिसांनी तपास सुरु केला. तपासादरम्यान आरोपीने कर्नाटकातील मृत व्यक्तीचे ओळखपत्र वापरल्याचे समोर आले.

पुढील तपासात असे लक्षात आले की, आरोपीने सदर कार बेळगाव येथील अन्य व्यक्तीस एका स्टोअरद्वारे विकली होती. सदर कार बेळगाव येथून जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, संशयित फरार होता आणि त्याने कर्नाटकातील विविध भागात असे गुन्हे केले होते. अखेर कर्नाटक पोलिसांच्या मदतीने पर्वरी पोलिसांनी संशयिताला बंगळुरू येथे पकडले.

संशयिताने पर्वरी येथील अन्य एका बॅंकेची फसवणूक केल्याचीही तक्रार दाखल आहे. दिलीप राजेगौडा (32) रा. धारवाड, कर्नाटक असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयिताला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून संशयिताच्या पत्नीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electricity Conservation: विजेची बचत करा! शासकीय कार्यालयांना सावंत सरकारचा आदेश; नियमांचे पालन न केल्यास...

Cash For Job Scam: मंत्र्यांच्‍या कार्यालयांशी जवळीक, म्हणून अनेकजण भुलले 'श्रुतीला'; कष्टाची कमाई गमावली !

Rashi Bhavishya 15 November 2024: आरोग्यात सुधारणा होईल, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती कराल; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

हायकोर्टाने तयार केलेल्या सेवाशर्तीच्या नियमात बदल; गोवा सरकारचा बचाव करणाऱ्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Cash For Job Scam: 'प्रत्येकाला वाटतंय मीच CM, गोवा सरकारमध्ये सुरुय सर्कस, सगळे जोकर खेळतायेत'; LOP युरींची टीका

SCROLL FOR NEXT