Khapreshwar Temple Issue Goa Dainik Gomantak
गोवा

Khapreshwar Temple: देवाचा कौल अंतिम! मंदिराच्या वादाला पूर्णविराम; खापरेश्वराच्या भाविकांना खवंटेंचे आश्वासन

Rohan khaunte on Khapreshwar Temple: मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी एक महत्वाची माहिती जाहीर केली आहे

Akshata Chhatre

पर्वरी: पर्वरीतील श्री खापरेश्वरा मंदिराच्या तसेच जुन्या वडाच्या झाडाच्या स्थानांतरामुळे वाद निर्माण झाला होता आणि आता पर्वरीचे आमदार आणि पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी बुधवारी (दि.५ मार्च) रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पर्यटनमंत्र्यांसह सुकूर पंचायतीचे काही सदस्य आणि स्थानिक देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी एक महत्वाची माहिती जाहीर केली आहे.

"मंदिर आखून दिलेल्या सीमेच्या आत नक्कीच येईल"

पर्वरीचे आमदार आणि पर्यटन मंत्री रोहन खवंटे, सुकुर पंचायत मंडळ व स्थानिकांनी खापरेश्वर देवस्थाना संदर्भात मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी झालेल्या चर्चेत त्यांनी बैठकीचे विषय मांडले. पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांनी सर्व भाविकांना देव खापरेश्वराचे मंदिर सीमेच्या आत येणार असे आश्वासन दिले आहे.

सीमा म्हणजे एक आखून दिलेली जागा असते, त्यामुळे खापरेश्वराचे मंदिर आखून दिलेल्या सीमेच्या आत नक्कीच येईल असं मंत्री म्हणालेत. देवाचा कौल जे सांगेल त्याप्रमाणे जागा निश्चित केली जाणार आहे. याचबरोबर मंदिरातील मूर्ती नवीन असेल की जुनी मूर्ती पुन्हा स्थापन केली जाईल याची माहिती देखील देवाचा कौल झाल्यानंतरच उघड होईल असं पर्यटनमंत्री म्हणाले आहेत.

"विनाकारण राजकारण करू नका!"

पर्यटनमंत्र्यांना याच दरम्यान पीडब्ल्यूडीच्या अभियंत्याकडून करण्यात आलेल्या तक्रारीविषयी देखील प्रश्न करण्यात आला होता, मात्र आता हा मुद्दा इथेच थांबलेला बरा असं म्हणत त्यांनी घडलेल्या गोष्टी विसरून पुढे पुढे जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना देखील दोन्ही पक्षांच्या वतीने सुरु असलेला वादविवादाचा मुद्दा इथेच थांबवण्याची विनंती केली असल्याची माहिती दिली आहे.

जात, धर्म असे विषय समोर आणून सुरु असलेल्या राजकारणात चॅपल हलवण्यात आले तेव्हा का आवाज उठवला नाही? असा प्रश्न विचारात त्यांनी न्यायलायचा निर्णय अमान्य करत स्वराक्षरी न केल्याचा दावा करणाऱ्यांची कान उघाडणी केली आहे. मंदीराचे बांधकाम पुन्हा सुरु होईल आणि आखून दिलेल्या सीमेत होईल असं म्हणत पर्यटनमंत्र्यांनी सर्वांना शांतात बाळगण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Record: ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर नवा 'वर्ल्ड रेकॉर्ड', अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला

Borim Accident: साकवार- बोरीत पार्क केलेल्या टेम्पोला कारची धडक

Goa Kadamba: गणेश चतुर्थीसाठी प्रवाशांची सोय; कदंब बसच्या आंतरराज्यीय फेऱ्या वाढणार

Rohit Sharma Viral Video: ट्रॅफिकमध्ये अडकूनही 'मुंबईचा राजा'नं जिंकली मनं; छोटासा हावभाव चाहत्यासाठी ठरलं मोठं 'Surprise'

Weekly Love Horoscope: प्रेमात नवा उत्साह! 'या' आठवड्यात 5 राशींना अनुभवता येईल आनंद आणि प्रेमातील बदल

SCROLL FOR NEXT