Khapreshwar Temple: ‘खाप्रेश्वरा’ची मूर्ती हटवतेवेळी हिंदू संघटना कुठे गेल्या होत्या? कवठणकरांचा सवाल

Sunil Kavthankar: कवठणकर म्हणाले की, २०० वर्षे जुने वडाचे झाड तोडून लगतचे मंदिर पाडण्याच्या या धक्कादायक आणि लज्जास्पद घटनेने भाजपच्या हिंदूंवरील प्रेमाचे दुटप्पी मापदंड उघड झाले आहे.
Sunil Kavthankar, Khapreshwar Temple
Sunil KavthankarDainik Gomantak
Published on
Updated on

Sunil Kavthankar About Khapreshwar Temple Removal

पणजी: पर्वरी परिसरातील राष्ट्रीय महामार्गाला अडथळा ठरत असल्याचे कारण दाखवित ‘वडाकडे’ या ठिकाणी असलेल्या खाप्रेश्वर देवाची मूर्ती हटविताना राज्यातील विविध हिंदू संघटना कुठे गेल्या होत्या. त्यांचे हिंदूत्व हे केवळ राजकारणासाठीच आहे काय? असा सवाल काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेस भवनात सोमवारी सांयकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी पक्षाचे प्रवक्ते तुलियो डिसोझा व इतरांची उपस्थिती होती.

कवठणकर म्हणाले की, २०० वर्षे जुने वडाचे झाड तोडून लगतचे मंदिर पाडण्याच्या या धक्कादायक आणि लज्जास्पद घटनेने भाजपच्या हिंदूंवरील प्रेमाचे दुटप्पी मापदंड उघड झाले आहे.

Sunil Kavthankar, Khapreshwar Temple
Khapreshwar Temple: पर्वरीच्या राखणदाराला हटवू नका! भाविकांना अश्रू अनावर; श्रीदेव खाप्रेश्वर मूर्ती स्थलांतरणामुळे वातावरण तंग

आरएसएस, बजरंग दल यासारख्या सर्व भाजप संलग्न संघटनांनी या तोडफोडी आणि राखनदार देव खाप्रेश्वराची मूर्ती आणि मंदिराच्या विटंबनेवर मौन बाळगल्याचे दिसून आले आहे.

या विटंबनेमुळे व्यावसायिक इमारतीचा पुढचा भाग उघड झाला आहे. उड्डाण पुलाचे संरेखन केवळ ४०० मीटर अंतरावर असलेल्या शॉपिंग मॉलला वाचवण्यासाठी चालू आहे. पूर्वी भाजपने इतर धर्मांना लक्ष्य केले होते, आता ते स्वार्थासाठी हिंदूंनाच लक्ष्य करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

Sunil Kavthankar, Khapreshwar Temple
Khapreshwar Porvorim: खाप्रेश्वराच्या मूर्तीचे गुपचूप स्थलांतर; "आता वडाकडे अशे काय उरोंक ना" पर्वरीवासियांकडून निषेध

पोलिसांत तक्रार दाखल

देव खाप्रेश्वराची मूर्ती बेकायदेशीरपणे हटवल्याबद्दल आणि विटंबना केल्याबद्दल पर्वरी पोलिस ठाण्याचे अधिकारी, बार्देशचे मामलेदार आणि महामार्ग कंत्राटदार यांच्याविरुद्ध गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असल्याचे कवठणकर यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com