Khapreshwar Porvorim: विकास अडवणाऱ्यांना पर्यटनमंत्र्यांचे उत्तर; 'मंदिर पुन्हा बांधणार' पर्वरीतील वादावर दिले ठोस आश्वासन

Rohan Khaunte Goa: घडलेल्या एकूण प्रसंगावर पर्वरीचे आमदार आणि पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी एक महत्वाचे विधान केले आहे
 goa tourism minister
goa tourism ministerDainik Gomantak
Published on
Updated on

पर्वरी: वडाकडे, पर्वरी येथील २०० वर्ष जुन्या वडाचे झाड हटवण्यात आले. महामार्गाच्या विस्तारात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून हे वडाचे झाड हटवण्यात आलेय, मात्र यासोबतच खाप्रेश्वर मंदिर आणि मूर्ती देखील हलवण्यात आलीये. खाप्रेश्वर हा स्थानिकांच्या मते राखणदार आहे आणि न्यायालयाच्या आदेशानुसार खाप्रेश्वर मंदिर हटवावे असा आदेश जारी करण्यात आला नव्हता, मात्र तरीही हे मंदिर हलवण्यात आले असल्याने स्थानिकांनी सरकारविरुद्ध रोष व्यक्त केला. घडलेल्या एकूण प्रसंगावर पर्वरीचे आमदार आणि पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी एक महत्वाचे विधान केले आहे.

केवळ राजकीय फायद्यासाठी विरोध

पर्यटनमंत्र्यांनी पर्वरीत सुरु असलेल्या वादाचा निषेध केलाय. त्यांनी या सर्व प्रकरणाला राजकीय नाटक म्हणत यावर आणखीन काहीही प्रतिक्रिया देण्यापासून टाळले. पर्यटनमंत्री म्हणतायत की विरोधी पक्षात असताना वर्ष २०१९ ते २०२२ मध्येच हे झाड हटवण्याचा संमतीपत्र जारी करण्यात आले होते.

 goa tourism minister
Porvorim Banyan Tree: 200 वर्षांचे 'आयुष्य' वाचवण्याची शर्थ! स्थलांतराने वडाचे आयुष्य धोक्यात?

पुढे मंत्री असं देखील म्हणालेत की हे प्रकरण नंतर सर्वोच्च न्यायालयात नेण्यात आले आणि निविदा काढण्यापूर्वी सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता जनतेने निर्णय घेण्यापूर्वी वस्तुस्थिती पडताळून पाहणं आणि संमतीपत्रांवर स्वाक्षरी केलेल्यांची नावे तपासणं गरजेचं आहे. केवळ राजकीय फायद्यासाठी सुरु असलेला विरोध असल्याचं सांगत त्यांनी याबद्दल खेद व्यक्त केलाय.

खाप्रेश्वर मंदिर पुन्हा बांधणार!!

सध्या पर्वरीत मंदिराचा वाद सुरु असला तरी देखील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार खाप्रेश्वराचे मंदिर सुकूर येथे पुन्हा बांधले जाईल. गोवा सरकार जनतेच्या भावनांचा आदर करत असून जनतेने देखील सरकारला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. सुरु असलेल्या वादावर सरकारकडून नक्कीच तोडगा काढला जाईल त्यामुळे जनतेने चिंता करू नये असं मंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com