Goa Education Dainik Gomantak
गोवा

Portuguese Education System In Goa: कोकणीवर बंदी, लिसेव म्हणजे काय? पोर्तुगीज काळात कशी होती गोव्यात शिक्षण व्यवस्था?

How Was Portuguese Education System in Goa: गोव्याच्या इतिहासात पोर्तुगीज शिक्षण पद्धतीचा मोठा प्रभाव होता. पोर्तुगीजांनी आपल्या राजवटीदरम्यान शैक्षणिक व्यवस्थेत अनेक मोठे बदल घडवून आणले.

Manish Jadhav

Portuguese Education System In Goa History And Impact

गोव्याच्या इतिहासात पोर्तुगीज शिक्षण पद्धतीचा मोठा प्रभाव होता. पोर्तुगीजांनी आपल्या राजवटीदरम्यान शैक्षणिक व्यवस्थेत अनेक मोठे बदल घडवून आणले. त्यांनीच वाचनालये, व्याख्यानमाला, नियतकालिके, मासिके, तसेच मराठी शिक्षण संस्थांची सुरुवात केली. चार शतकांहून अधिक काळ गोव्यात जबरदस्तीने परदेशी भाषाच नव्हे तर पोर्तुगीजांनी परदेशी संस्कृतीही शिकवली. पोर्तुगीजांनी यादरम्यान स्त्रियांच्या शिक्षणालाही महत्त्व दिले. डॉ. पार्वती रायतुरकर यांनी आपल्या 'गोवा दिसला तसा' या पुस्तकातून गोव्यातील पोर्तुगीजकालीन शिक्षणपद्धतीवर प्रकाश टाकला. चला तर मग आज (23 मार्च) या लेखाच्या माध्यमातून पोर्तुगीजकालीन गोव्यातील शिक्षणपद्धतीविषयी जाणून घेऊया...

शिक्षणपद्धतीवर भर

पोर्तुगीजांनी आपल्या राजवटीदरम्यान धर्म परिवर्तन आणि शिक्षणपद्धतीवर खास जोर दिला. त्यांनी गोमंतकीयांना शिक्षणाची दारे खुली केली, पण त्यांना कारकूनीपर्यंतच्या शिक्षणापर्यंतच मर्यादित ठेवले. काउंट ऑफ अल्व्होरचे व्हॉइसरॉय फ्रान्सिस्को ताव्होरा याने 1684 मध्ये कुप्रसिद्ध ‘अल्वारा’ संमत करुन शासकीय कामांसाठी कोकणी वापरण्यास मनाई केली. त्याचवेळी, पोर्तुगीज भाषा शिकण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी देण्यात आला. पुढे 1773 मध्ये पोर्तुगीजांनी गोव्यातील (Goa) विविध भागात सार्वजनिक व्याकरण शाळा स्थापन केल्या. एवढेच नाहीतर पोर्तुगिजांनी गोव्याच्या जनतेसाठी उच्च शिक्षणाचे दारेही खुली केली.

पोर्तुगीज शिक्षण पद्धतीचा आराखडा

पोर्तुगीज शिक्षण प्रणाली तीन मुख्य टप्प्यांत विभागली होती.

1. प्राथमिक शिक्षण (प्रिमेर ग्रांव) – 1 वर्ष

2. माध्यमिक शिक्षण (सेगुंद ग्रांव) – 2 वर्षे

3. उच्च शिक्षण (लिसेव) – 7 वर्षे

लिसेव शिक्षणातील विषय

लिसेव शिक्षणात विविध शास्त्रे आणि भाषा शिकवण्याची सोय होती. खालील विषय विद्यार्थ्यांना शिकवले जात.

  • भूगोल

  • गणित

  • सृष्टीशास्त्र

  • जीवशास्त्र

  • रसायनशास्त्र

  • अर्थशास्त्र

  • तत्त्वज्ञान

  • पोर्तुगीज साम्राज्याचा इतिहास

  • नीतीशास्त्र आणि नागरिकशास्त्र

  • येशू ख्रिस्ताचे जीवनचरित्र याशिवाय, खालील भाषा शिकवण्याची सोय होती:

    मराठी

    लॅटिन

    इंग्जी

    जर्मन

    संस्कृत

  • याशिवाय, कलात्मक आणि व्यावहारिक शिक्षणासाठीही इतर विषय त्यावेळी होते.

    चित्रकला

    हस्तव्यवसाय

    व्यायाम

    गायन

तसेच, पोर्तुगीजांनी गोमंतकीयांना उच्च शिक्षणाचे पर्याय उपलब्ध करुन दिले होते. लिसेव पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी वेगवेगळे पर्याय होते.

वैद्यकीय शिक्षण (5 वर्षे): आशियातील पहिले मेडिकल कॉलेज 1842 मध्ये पोर्तुगीजांनी गोव्यात सुरु केले.

फार्मसी (औषधसिद्धी विद्यालय): 2 वर्षे

रुग्णसेवा (नर्सिंग/प्रसूतीशास्त्र): 2 वर्षे

कायद्याचे शिक्षण: 3 वर्षे

सरकारी नोकरीसाठी पात्रता

पोर्तुगीज राजवटीत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी लिसेव उत्तीर्ण होणे अनिवार्य होते.

अध्यापक प्रशिक्षण विद्यालय (नॉर्मल स्कूल): 3 वर्षे

धार्मिक शिक्षण (रायतूर सेमिनरी): ख्रिश्चन धर्मप्रचारक आणि धर्मगुरु बनण्यासाठी 8 वर्षांचा कोर्स

सांता मोनिका मठातील धार्मिक शिक्षण: पाद्री आणि माद्री होण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाई.

मराठी आणि इंग्रजी शिक्षणाचा उदय

1925-30 पर्यंत गोव्यात अनेक मराठी शाळा सुरु झाल्या. यासोबतच इंग्रजी माध्यमाच्या शाळाही मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या. भविष्यातील संधी लक्षात घेता इंग्रजी शिक्षण महत्त्वाचे वाटू लागले, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी लिसेव सोडून इंग्रजी शाळांकडे वळणे पसंत केले. गोव्यातील शिक्षणपद्धती पोर्तुगीजांच्या काळात विकसित झाली असली, तरी मराठी आणि इंग्रजी शिक्षणाचा प्रभावही वाढू लागला, ज्यामुळे पुढील पिढीला जागतिक स्तरावर शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Lok Sabha Speech: काँग्रेसच्या काळातच 'नक्षलवाद' फोफावला! अमित शाह यांचं टीकास्त्र; इंदिरा गांधींपासून मनमोहन सिंगांपर्यंत वाचला चुकांचा पाढा

Horoscope April 2026: सुवर्णसंधी! ग्रहांच्या खेळात मिथुन राशी ठरणार 'किंग'; 2 एप्रिलनंतर भाग्याची मिळणार साथ अन् श्रीमंतीचं स्वप्न होणार पूर्ण

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT