Goa Portuguese-era Bridges Audit: गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa heritage bridge restoration plans: पोर्तुगीजकालीन मिळून राज्यातील कमकुवत पुलांची स्थिरता आता स्पष्ट होणार आहे. सरकारच्या निर्णयानुसार सध्या पुलांचे 'स्ट्रक्चरल ऑडिट' सुरू आहे.
Portuguese bridges
Portuguese bridgesDainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim: पोर्तुगीजकालीन मिळून राज्यातील कमकुवत पुलांची स्थिरता आता स्पष्ट होणार आहे. सरकारच्या निर्णयानुसार सध्या पुलांचे 'स्ट्रक्चरल ऑडिट' सुरू आहे. गुरुवारी डिचोली शहरातील जुन्या पोर्तुगीजकालीनसह नवीन समांतर मिळून दोन्ही पुलांची स्थिरता तपासण्यात आली.

या कामासाठी सरकारने मुंबईस्थित ''स्टकवेल कन्सल्टन्ट'' कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. या कंपनीकडून सध्या डिचोली शहरातील मिळून म्हावळींगे येथील ''चामरकोंड'' साळ, शिरगाव आदी भागातील लहानमोठ्या पुलांची तपासणी करण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी शहरातील पुलांची तपासणी करतेवेळी सार्वजनिक बांधकाम खाते डिचोलीच्या कार्यकारी अभियंता रश्मी मयेकर यांच्यासह अन्य अधिकारी तसेच स्टकवेल कंपनीचे तज्ज्ञ अधिकारी उपस्थित होते. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनीही कामाची पाहणी केली.

Portuguese bridges
Goa Crime News: पैशांसाठी मित्रांचा खून करणारा काजीदोनी दोषी; संशयिताची बाजू ऐकून कोर्ट ठोठावणार शिक्षा

तपासणीसाठी खास यंत्रणा

''ब्रीज इन्स्पेक्शन मोबाईल युनिट'' या खास यंत्रणेद्वारे स्टकवेल या सल्लागार कंपनीकडून पुलांची तपासणी करण्यात येत आहे. पूल किती जुना आहे. पुलाची रचना, वापरण्यात आलेले बांधकाम साहित्य आणि पुलांचे आयुष्यमान याची तपासणी करण्यात येत आहे. स्टकवेल कंपनीचे प्रकल्प अभियंता सी. चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे खास पथक पुलांची तपासणी करत आहे. पुलांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित सल्लागार कंपनीकडून पुलांच्या स्थिरतेसंदर्भातचा अहवाल तयार करून तो राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती सल्लागार कंपनीचे अधिकारी सी. चंद्रशेखर यांनी दिली. अहवाल आल्यानंतरच पुलांचे भवितव्य निश्चित होणार आहे.

१५० पुलांची तपासणी होणार

बुधवारी वाळवंटी नदीवरील मिळून साखळी भागातील पुलांची तपासणी करण्यात आली. पुलांच्या तपासणीचा अहवाल मिळाल्यानंतरच पुलांचे भवितव्य स्पष्ट होणार आहे. राज्यातील बहुतांश भागातील पूल हे पोर्तुगीजकालीन आहेत. काही पूल कमकुवत झाले आहेत. त्याच अनुषंगाने पुलांच्या तपासणीला राज्य सरकारने प्राधान्य दिले आहे. सध्या उत्तर गोव्यातील लहानमोठे मिळून जवळपास १५० पूल तपासण्यात येणार आहेत, अशी माहिती सरकारी सूत्रांकडून मिळाली आहे.

Portuguese bridges
Goa Crime News: अट्टल गुन्हेगार मारियासह दोघेजण गजाआड! पर्वरी पोलिसांची धडक कारवाई; संशयितांना 6 दिवसांची कोठडी

रश्मी मयेकर, कार्यकारी अभियंता, पीडब्ल्यूडी

सल्लागार कंपनीकडून प्रथमच पुलांची तपासणी करण्यात येत आहे. डिचोली शहरातील जुना पूल हा ६० वर्षांपूर्वी बांधण्यात आला आहे. त्यामुळे या पुलाच्या स्थिरतेसंदर्भात तपासणी केली ही चांगली गोष्ट आहे. डिचोलीसह सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व पुलांची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी अहवाल आल्यानंतर पुलांच्या बाबतीत निर्णय अपेक्षित आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com