St Francis Xavier’s exposition, Pope Francis Dainik Gomantak
गोवा

Pope Goa Visit: फ्रान्सिस झेवियर यांचे दर्शन घेण्यासाठी पोप गोव्यात येणार? कॅथलिक मंत्र्याने दिले संकेत

Saint Francis Xavier Exposition: पोप लवकरच भारतात येण्याची शक्यता आहे. अपेक्षा आहे की या भेटी दौऱ्यात गोव्याचा देखील समावेश असेल, असे मंत्री गुदिन्हो यांनी म्हटले आहे.

Pramod Yadav

ओल्ड गोवा: येथे संत फ्रान्सिस झेवियर यांचा शवदर्शन सोहळा गेल्या महिन्यात सुरु झाला आहे. या सोहळ्याला गेल्या बारा दिवसात तीन लाखांहून अधिक भाविकांनी भेट दिल्याची माहिती समोर आलीय. झेवियर यांच्या दर्शनाला पोप भेट देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकारमधील कॅथलिक मंत्र्यांनी याबाबत संकेत दिले आहेत.

२१ नोव्हेंबरपासून ओल्ड गोव्यात सुरु झालेल्या दशवार्षिक संत फ्रान्सिस झेवियर शवदर्शन सोहळ्याला रोमन कॅथलिक चर्चचे सर्वोच्च धर्मगुरु पोप उपस्थित राहण्याची शक्यता सावंत सरकारमधील वाहतूक आणि पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केलीय. पोप लवकरच भारतात येण्याची शक्यता आहे. अपेक्षा आहे की या भेटी दौऱ्यात गोव्याचा देखील समावेश असेल, असे मंत्री गुदिन्हो यांनी म्हटले आहे.

आम्ही सर्वधर्मीय पोप यांच्या आगमनाची वाट पाहत आहोत, असेही मंत्री माविन गुदिन्हो यांनी म्हटले आहे. शवदर्शन सोहळ्याची घोषणा झाल्यापासून पोप यांच्या गोवा भेटीबाबत सूतोवाच केले जात होते. दरम्यान, पोप गोव्यात येण्याची शक्यता मावळत गेली. पण, मंत्री माविन यांच्या वक्तव्याने पोप यांच्या गोवा भेटीबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत.

व्हॅटिकन धर्मगुरुंनी घेतले फ्रान्सिस झेवियर यांचे दर्शन

काही दिवसांपूर्वी व्हॅटिकनहून आलेल्या काही धर्मगुरुंनी बुधवारी (दि. २७ नोव्हेंबर) फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र शवप्रदर्शन सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी व्हेनेझुएलाचे मुख्य बिशप एडगर पेना पर्रा आणि गोवा आणि दमणचे मुख्य बिशप कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव देखील उपस्थित होते. पोप यांनी गोव्यासाठी अनेक आशीर्वाद पाठवल्याची माहिती एडगर पेना पर्रा यांनी यावेळी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT