Saint Francis Xavier History: स्पेनच्या राजघराण्यात जन्म झालेले फ्रान्सिस झेवियर हे भारतात का आले?

Life Journey Of Francis Xavier: धर्मप्रसाराच्या वैशिष्ट्यपूर्ण ‘कले’मुळे झेवियर यांनी धर्मप्रसाराचं नेत्रदीपक काम केलं, त्यामुळे चीनसारख्या देशातही त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली.
Saint Francis Xavier, Saint Francis Xavier Life Mission Facts In Marathi, Old Goa Church
Saint Francis Xavier Exposition At Old Goa ChurchDainik Gomantak
Published on
Updated on

Saint Francis Xavier Goa History In Marathi

निसर्गसमृद्ध आणि जागतिक पर्यटन नकाशावर मोठ्या हिकमतीने नाव कमावलेल्या आणि सर्वधर्मसमभावाचे आदर्श ठिकाण असलेल्या गोव्यात सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा दशवार्षिक पार्थिव दर्शनाचा सोहळा सुरू झाला. पणजीपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या जुने गोवे येथील ‘सेंट कॅथ्रेडल’ चर्चमध्ये २१ नोव्हेंबरपासून दर्शन घेता येणार आहे.

3 डिसेंबर १५५२ रोजी चीनमध्ये (China) तापाशी झुंज देत असताना ख्रिस्तवासी झालेल्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पार्थिव साडेचारशेहून अधिक वर्षे उलटूनही आहे त्याच अवस्थेत कसं टिकून राहिलं, ही एक आश्चर्यकारक बाब आहे. पेशाने सेंट (धर्मप्रसारक) असलेल्या फ्रान्सिस झेवियर यांनी आपल्या संतपदाच्या काळात धर्मप्रसाराचं कार्य अतिशय प्रभावीपणे केलं होतं, अशी इतिहासात नोंद आहे.

Saint Francis Xavier, Saint Francis Xavier Life Mission Facts In Marathi, Old Goa Church
Saint Francis Xavier Exposition: एक हजार पोलीस, ४०० CCTV कॅमेरा, ATS कमांडो; भाविकांच्या सुरक्षेसाठी गोवा पोलीस सज्ज

संत फ्रान्सिस झेव्हिअर यांचा जन्म कुठे झाला?

७ एप्रिल १५०६ मध्ये स्पेनच्या नवा या प्रांतात तत्कालिन राजघराण्यात झेवियरचा जन्म झाला. त्यांनी पॅरिसला जाऊन सेंट बार्बेस विद्यापीठातून एम.ए.पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं. ज्या विद्यापीठात त्याचं शिक्षण झालं होतं, तिथेच त्यांना प्राध्यापकाची नोकरीही मिळाली होती. तथापि, झेवियर यांचा अधिक कल अध्यात्माकडे होता. (St Francis Xavier Education)

पंधराव्या शतकात युरोपीय देशात विशेषत: पोर्तुगालमध्ये वसाहतवाद आणि व्यापार या बरोबरच धर्मप्रसाराला राज्यकर्ते अधिक प्रोत्साहन देत असत. पोर्तुगालने १५४० मध्ये व्हॅटिकन सिटीचे पोप यांना आपल्या भारतीय वसाहतीत धर्मप्रसाराचं काम करण्यासाठी दोन धर्मप्रसारक हवे असल्याची विनंती केली. त्यानुसार पोपनी दोन मिशनऱ्यांना भारतात पाठवण्याचं ठरवलं, मात्र ऐनवेळी त्यांपैकी एकजण आजारी पडल्याने त्यांच्याऐवजी फ्रान्सिस झेवियर यांना भारतात पाठवण्याचं ठरलं.

Saint Francis Xavier, Saint Francis Xavier Life Mission Facts In Marathi, Old Goa Church
Saint Francis Xavier Exposition: 10 वर्षानंतर पहिल्यांदाच समोर आले संत फ्रान्सिस झेवियर यांचे शव; पाहा पहिली झलक

गोयंचो साहेब कोणाला म्हणतात?

७ एप्रिल १५४१ रोजी फ्रान्सिस झेवियर यांनी ‘सांतियागो’ या बोटीनं गोव्यात (Goa) येण्यासाठी पोर्तुगालहून प्रस्थान केलं. वाटेत मोझांबिक या तत्कालीन पोर्तुगीज राजवट असलेल्या देशात काही काळ थांबून तिथे धर्मप्रसाराचं काम करून फ्रान्सिस ६ मे १५४२ रोजी गोव्यात पोहचले. गोव्यात आल्यानंतर त्यांनी ख्रिस्ती धर्माच्या विस्ताराचं ‘न भुतो..’ असं कार्य करून धर्मविस्तार केला. त्यामुळेच त्यांना पुढे संतपद (सेंट) हे पद बहाल करण्यात आलं व त्यांना ‘गोंयचो साहेब’ हे बिरूदही लागू झालं. (St Francis Xavier How He Reached goa)

१५४७ च्या डिसेंबरमध्ये फ्रान्सिस झेवियर धर्मप्रसारासाठी जपानला गेले. १५४८ मध्ये ते पुन्हा गोव्यात आले. एप्रिल १५४९ मध्ये ते पोर्तुगालला गेले. तिथून पुन्हा जपान, चीन आणि अन्य काही देशांचा प्रवास करत १५५२ मध्ये त्यांनी पुन्हा गोव्यात पाय ठेवले. पुन्हा त्याच वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात ते चीनला गेले.

Saint Francis Xavier, Saint Francis Xavier Life Mission Facts In Marathi, Old Goa Church
Saint Francis Xavier Exposition: शवदर्शन सोहळ्यासाठी येताय? गोवा पोलिसांनी जारी केलेली नियमावली वाचा

फ्रान्सिस झेव्हिअर यांचे निधन कधी आणि कुठे झाले?

धर्मप्रसाराच्या वैशिष्ट्यपूर्ण ‘कले’मुळे त्यांनी तिथेही धर्मप्रसाराचं नेत्रदीपक काम केलं, त्यामुळे चीनसारख्या देशातही त्यांना अमाप लोकप्रियता प्राप्त झाली. ‘जिझस ख्रिस्ताचा दूत’ असं त्यांना मानलं जाऊ लागलं. चीनमध्ये असतानाच साथीच्या तापानं गंभीर आजारी पडून शँगच्युन येथे ३ डिसेंबर १५५२ रोजी त्यांचं देहावसान झालं. कुशल धर्मप्रसारक म्हणून जगद्विख्यात झालेल्या झेवियर यांची मरणोत्तर कहाणीही मोठी अद्भूत आहे.

शँगच्युन या चीनच्या प्रांतात दफन करण्यात आलेले झेवियर यांचे शव त्यांच्या मरणानंतर केवळ तीन महिन्यांत फेब्रुवारी १५५२ मध्ये थडगे उकरून बाहेर काढण्यात आले आणि ते पोर्तुगालमधल्या मोलोको प्रांतातील दफनभूमीत नेऊन दफन करण्यात आले. तिथून ते पुन्हा बाहेर काढून ११ डिसेंबर १५५३ मध्ये गोव्यात आणून जुने गोवा येथे दफन करण्यात आलं. तिथून पुन्हा एकदा ते बाहेर काढून २ डिसेंबर १६३७ रोजी हे पार्थिव जुनं गोवा येथील आज ते जिथे ठेवण्यात आलं आहे, त्या ‘बॉँ जिझस’ चर्चमध्ये चांदीच्या शवपेटीत सुरक्षित ठेवण्यात आलं आहे.

संत फ्रान्सिस झेव्हिअर यांच्या पार्थिवाचे दर १० वर्षांनीच दर्शन घेता येते का?

इतर दिवशी ‘बॉँ जिझस’ चर्चला भेट देणाऱ्या भाविकांना या पवित्र शवाचं दर्शन दुरूनच घेता येतं. मात्र दर दहा वर्षानी ते पार्थिव हजारो भाविकांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत त्या चर्चच्या समोरच असलेल्या ‘सेंट कॅथ्रेडल’ चर्चमध्ये ठेवण्यात येतं. या काळात विविध वेळी आणि विविध भाषांतील खास प्रार्थनासभांचंही आयोजन करण्यात येतं. केवळ ४६ वर्षाचं आयुष्य जगलेल्या फ्रान्सिस झेवियर यांनी धर्मप्रसाराचं अचाट कार्य केलं. त्यामुळेच चार शतकं उलटल्यावरही त्यांचा महिमा आजही टिकून राहिलेला आहे.

यावर्षी हे सतरावं शवदर्शन आहे. सेंट फ्रान्सिसच्या पवित्र शवाचं दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून श्रद्धाळू भाविक आणि पर्यटकही मोठय़ा संख्येनं येतात. सेंट फ्रान्सिस झेवियरला आपल्या अडचणी सोडवण्यासाठी घातलेलं सांकडं पूर्ण होतं, अशी इथे येणाऱ्या भाविकांची प्रगाढ श्रद्धा आहे. त्यातूनच दर दहा वर्षानी लक्षावधी आबाल-वृद्ध, महिला-पुरुष भाविकांचे पाय ‘गोंयच्या साहेबा’चं जवळू न दर्शन घेण्यासाठी जुन्या गोव्याकडे आपोआप वळतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com