Pope Francis Passes Away Dainik Gomantak
गोवा

Pope Francis :...अखेर पोप फ्रान्सिस यांचा गोव्यात येण्याचा योग आलाच नाही

Pope Francis Goa Visit Remained Unfulfilled: पोप फ्रान्सिस (88) यांचे सोमवार (21 एप्रिल 2025) व्हॅटिकन सिटीमध्ये निधन झाले. ते बराच काळ आजारी होते. फ्रान्सिस यांना नुकतेच न्यूमोनियाच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Manish Jadhav

पणजी: पोप फ्रान्सिस (88) यांचे सोमवार (21 एप्रिल 2025) व्हॅटिकन सिटीमध्ये निधन झाले. ते बराच काळ आजारी होते. पोप यांना नुकतेच न्यूमोनियाच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोप फ्रान्सिस यांच्या निधनाचे वृत्त व्हॅटिकन सिटीने दिले. निधनाच्या एक दिवस आधी ते अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांना भेटले होते. दरम्यान, पोप फ्रान्सिस काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या सेंट फ्रान्सिस झेवियर शवदर्शन सोहळ्याला भेट देण्यासाठी गोव्यात येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. दरम्यान, ही भेट अधुरीच राहिली.

सेंट फ्रान्सिस झेवियर शवदर्शन सोहळा

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी गेल्या वर्षी झालेल्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवदर्शन सोहळ्यासाठी पोप फ्रान्सिस यांना आमंत्रित करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली होती. गोवा सरकार याबाबत प्रधानमंत्री कार्यालयाकडे पोप यांच्या भारत दौऱ्यासंबंधी विनंती करणार असल्याचे म्हटले होते.

45 दिवसांच्या कार्यक्रमाच्या तयारीबाबत पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर मुख्यमंत्री म्हणाले होते की, 'आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पोप फ्रान्सिस यांना गोव्यात येण्याचे आमंत्रण देण्याची विनंती करु.' विशेष म्हणजे, जेव्हा पंतप्रधान पोप यांना भेटले तेव्हा त्यांनी त्यांना भारत भेटीचे आमंत्रणही दिले होते. मात्र पोप यांचे भारत भेटीचे स्वप्न अधुरेच राहिले.

पोप फ्रान्सिस यांचे निधन

व्हॅटिकन न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, पोप यांनी व्हॅटिकन सिटीमधील कासा सांता मार्टा या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून पोप यांची प्रकृती खालावत होती आणि रुग्णालयात (Hospital) उपचार घेतल्यानंतर ते अलीकडेच त्यांच्या निवासस्थानी परतले होते. ते शेवटचे ईस्टरच्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी दिसले होते. त्यांना पाहून जगभरातील त्यांच्या अनुयायांचे डोळे पाणावले होते. रुग्णालयातून परतताना त्यांनी बाहेर वाट पाहणाऱ्या अनुयायांना आशीर्वादही दिला होता. ते त्यांच्या करुणामय स्वभावासाठी आणि शांती आणि मानवतेच्या संदेशांसाठी नेहमीच लक्षात राहतील.

ते एक महिन्यापेक्षा जास्त काळ रुग्णालयात दाखल होते

पोप फ्रान्सिस (Pope Francis Passes Away) यांना 14 फेब्रुवारी रोजी प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या मते, त्यांना डबल न्यूमोनिया झाला होता, ज्यामुळे त्यांना दीर्घकालीन वैद्यकीय देखरेखीची आवश्यकता होती. एका महिन्यापेक्षा जास्त काळ रुग्णालयात राहिल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, परंतु त्यांच्या प्रकृतीत पूर्णपणे सुधारणा झाली नाही. त्यांची काळजी घेणारे व्हॅटिकनचे शस्त्रक्रिया प्रमुख डॉ. सर्जियो अल्फिएरी यांनी सांगितले होते की, त्यांना नियमित औषधांची आवश्यकता राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar 2026: कौटुंबिक सुख, रोमान्स अन् अफाट पैसा...! शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन; 5 राशींना होणार तगडा धनलाभ

Savanar Maye tree fall: सावनार-मये येथे घरावर कोसळली झाडे, दोन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान; मोठा अनर्थ टळला

रस्ता सुरक्षेपेक्षा दंडवसुलीला सरकारचे प्राधान्य; 22 ब्लॅकस्पॉटची दुरुस्त कधी? 1,520 मृत्यूंबाबत काँग्रेस सेवा दलाचे सवाल

Thivim Theft: थिवीत वीजतारांवर डल्ला! 83 हजार 437 रुपयांचा मुद्देमाल चोरीला; पश्चिम बंगालमधील 21 वर्षीय संशयिताला अटक

Chikhal Kalo Festival: माशेलचा चिखलकाला; सरकारी राज्योत्सव

SCROLL FOR NEXT